चाकरमान्यांची वारी आता आणखी सोपी
रेल्वे प्रशासनाच्या नव्या निर्णयानुसार गाडी क्रमांक 02198 जबलपूर-कोइम्बतूर ही साप्ताहिक स्पेशल ट्रेन 6 मार्च 2026 ते 27 डिसेंबर 2030 या कालावधीत धावणार आहे. तसेच परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक 02197 कोइम्बतूर-जबलपूर ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल स्पेशल ट्रेन 9 मार्च 2026 ते 30 डिसेंबर 2030 पर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षे ही ट्रेन नियमितपणे कोकण रेल्वे मार्गावर धावत राहणार आहे.
advertisement
असे असतील या ट्रेनचे थांबे
या ट्रेनचे प्रमुख थांबे नरसिंगपूर, इटारसी, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, मडगाव, कारवार, उडुपी, मंगळुरू, कासारगोड, कोझिकोड, शोरनूर आणि पालघाट अशा महत्त्वाच्या स्थानकांवर असतील. विशेष म्हणजे या ट्रेनच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये, धावण्याच्या दिवसांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
अधिक माहितीसाठी रेल्वेचे संकेतस्थळ तपासा
या निर्णयामुळे कोकण आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या प्रवाशांचे प्रवास नियोजन अधिक निश्चित आणि सोपे होणार असून, सण-उत्सव तसेच सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. अधिक माहितीसाठी प्रवाशांनी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
