दरम्यान, रेल्वेने जनरल तिकीटाबाबत प्रवाशांच्या मनात असलेला मोठा संभ्रम दूर केला आहे. 'यूटीएस' मोबाइल ॲपच्या माध्यमातून बुक केलेल्या तिकिटाची प्रिंट काढण्याची कोणतीही गरज नाही, असे स्पष्टीकरण भारतीय रेल्वेने दिले आहे. मोबाइलमधील 'शो तिकीट' हा पर्याय तिकीट तपासनीसाला दाखवल्यास ते पूर्णपणे वैध मानले जाईल. या निर्णयामुळे अनेक प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. खरंतर, अनेक प्रवासी 'यूटीएस' मोबाइल ॲपवरून तिकिट बूक करतात. त्यांच्यासाठी हा एकप्रकारे दिलासा म्हणता येईल. रेल्वेने हा निर्णय देत अनेकांना दिलासा दिला आहे.
advertisement
अनेक प्रवासी 'यूटीएस' मोबाइल ॲपवर तिकिट काढताना, बूक अँड प्रिंटचा वापर करून तिकिट काढत असतात. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी तिकिटाची प्रिंट काढणं अनिवार्य होतं. परंतु आता तिकिट काढणं अनिवार्य नसणार आहे. अलीकडेच रेल्वेने दिलेल्या नव्या नियमानुसार, प्रवाशांना पेपर तिकिट काढणं अनिवार्य नसणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अनेक प्रवासी बनावट तिकिट वापरून प्रवास करताना दिसत आहे. बनावट तिकिटांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. अशा प्रवाशांविरोधात रेल्वे गुन्हा सुद्धा दाखल करत आहे. सोबतच बनावट तिकिट वापरणाऱ्या आणि विकणाऱ्या टोळीचा रॅकेट उघडकीस येताना दिसत आहे.
