TRENDING:

Mumbai: iphone 17 खरेदीआधी BKC मध्ये राडा, रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांची एकमेकांना मारहाण, VIDEO

Last Updated:

देशभरात नव्यानं लाँच झालेल्या आयफोन 17 विक्रीला आजपासून सुरूवात..आयफोन खरेदीसाठी ग्राहकांची उडाली झुंबड.....

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
9 सप्टेंबर रोजी आयफोन 17 सीरिज लाँच करण्यात आली. त्या दिवसापासून प्रीबुकिंग सुरू झालं होतं. आजपासून प्रत्यक्षात आयफोन ग्राहकांच्या हातात मिळणार आहे. आयफोन खरेदीसाठी दुकानाबाहेर लांबच लांब रागां लागल्या आहेत. देशभरात आजपासून आयफोन 17 सीरिज मिळायला सुरुवात झाली आहे. खरेदीसाठी बीकेसी, पुण्यातील स्टोअर बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत आहे.
advertisement

ऍपलच्या नव्या आयफोन 17 च्या खरेदीसाठी मुंबईतील बीकेसी जिओ सेंटरमध्ये मोठी गर्दी उसळली होती. प्रचंड उत्साह आणि उत्सुकतेच्या वातावरणात, नवीन फोन लवकर मिळवण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की सुरू झाली. गर्दीचा वाढता दबाव आणि ग्राहकांमध्ये असलेला ताण यामुळे काही लोकांमध्ये बाचाबाची झाली आणि याचे रूपांतर छोट्याशा झटापटीत झाले.

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून सुरक्षा कर्मचाऱ्यांना तात्काळ हस्तक्षेप करावा लागला. त्यांनी लोकांना शांत करून परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली. या घटनेने आयफोनसाठी असलेल्या क्रेझची एक वेगळीच बाजू समोर आली, जिथे ग्राहकांनी केवळ फोन मिळवण्यासाठी एकमेकांशी वाद घातला.

advertisement

Apple च्या नव्या iPhone 17 Pro Max ने लाँच होताच धुमाकूळ घातला आहे. विशेषतः या फोनच्या कॉस्मिक ऑरेंज रंगाची मागणी इतकी प्रचंड आहे की, अमेरिका आणि भारत दोन्ही देशांमध्ये अवघ्या तीन दिवसांतच त्याचा संपूर्ण स्टॉक संपला आहे. भारतात तर Apple च्या अधिकृत स्टोअर्समध्येही सध्या हा फोन इन-स्टोअर पिकअपसाठी उपलब्ध नाही.

advertisement

कॉस्मिक ऑरेंज एवढा खास का?

Apple च्या तज्ज्ञांनुसार, iPhone 17 Pro Max Cosmic Orange साठी मोठ्या प्रमाणात प्री-बुकिंग झाली, ज्यामुळे तो इतक्या लवकर विकला गेला. कॉस्मिक ऑरेंज हा रंग iPhone 17 सीरिजमध्ये पहिल्यांदाच हा रंग आणला आहे. त्याचा आकर्षक प्रीमियम मॅट फिनिश ग्राहकांना खूप आवडला आहे. वाढती मागणी लक्षात घेता, कंपनी आता या रंगाचा नवीन स्टॉक लवकरच उपलब्ध करण्यासाठी काम करत आहे.

advertisement

किती रुपयांना मिळणार आयफोन

iPhone 17 256GB - 82,900 रुपये

iPhone 17 512GB - 1,02,900 रुपये

iPhone Air 256GB - 1,19,900 रुपये

iPhone Air 512GB - 1,39,900 रुपये

iPhone Air 1TB - 1,59,900 रुपये

iPhone 17 Pro 256GB - 1,34,900 रुपये

iPhone 17 Pro 512GB - 1,54,900 रुपये

iPhone 17 Pro 1TB - 1,74,900 रुपये

iPhone 17 Pro Max 256GB - 1,49,900 रुपये

iPhone 17 Pro Max 512GB - 1,69,900 रुपये

iPhone 17 Pro Max 1TB -1,89,900 रुपये

iPhone 17 Pro Max 2TB - 2,29,900 रुपये

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai: iphone 17 खरेदीआधी BKC मध्ये राडा, रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांची एकमेकांना मारहाण, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल