सुधाकर पठारे यांचं पोस्टिंग सध्या मुंबई पोलीस दलामध्ये पोर्ट झोनचे डीसीपी म्हणून केलं गेलं होतं. ट्रेनिंगसाठी सुधाकर पठारे हैदराबादला गेले होते, तेव्हा एका नातेवाईकासह ते ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला जात होते आणि हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये सुधाकर पठारे यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या नातेवाईकाचाही मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती तेलंगणा पोलिसांनी मुंबई पोलिसांना दिली आहे.
advertisement
कोण होते सुधाकर पठारे?
सुधाकर पठारे हे 2011 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. सुधाकर पठारे हे मूळचे अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेरमधील वाळवणेचे रहिवासी होते. आयपीएस होण्याआधी सुधाकर पठारे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. डॉ. सुधाकर पठारे यांनी एमएससी अॅग्री आणि एलएलबीही केलं होतं.
स्पर्धा परीक्षा देत असताना 1995 साली सुधाकर पठारे जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले, यानंतर 1996 साली विक्रीकर अधिकारी वर्ग 1 म्हणून त्यांची निवड झाली. 1998 साली सुधाकर पठारे पोलीस उपअधिक्षक झाले आणि त्यानंतर पोलीस दलामध्येच राहिले. सुधाकर पठारे यांनी आतापर्यंत पोलीस उपअधिक्षक म्हणून पंढरपूर, अकलूज, कोल्हापूर शहर, राजुरा येथे सेवा बजावली आहे.
याशिवाय अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पठारे चंद्रपूर, वसईमध्ये तर पोलीस अधीक्षक म्हणून सीआयडी अमरावतीमध्ये कार्यरत होते. पोलीस उपायुक्त म्हणून सुधाकर पठारे यांनी मुंबई, ठाणे, पुणे, वाशी, नवी मुंबई.
ठाणे शहरमध्ये सेवा बजावली. पोलीस खात्यामध्ये सुधाकर पठारे यांनी संघटित गुन्हेगारी (मोक्का), तडीपारी, एपीडीए अशा प्रतिबंधात्मक कारवायांचा धडाका लावला होता. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस दलात त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवले.