मुलीच्या ओरडण्याने पितळ उघडे
ही घटना कांदिवली पश्चिमेतील पटेल नगर परिसरातील एका खाजगी क्लिनिक,त घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ही अल्पवयीन मुलगी तिच्या आईसोबत दातांच्या उपचारासाठी क्लिनिकमध्ये गेली होती. उपचार सुरू असताना मुलीच्या आईला अचानक फोन आला. फोनवर बोलण्यासाठी आई काही वेळासाठी क्लिनिकबाहेर गेली.
याच संधीचा फायदा घेत आरोपी दातांचे डॉक्टर रवी सिंग याने मुलीशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने सांगितले की डॉक्टरने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. घाबरलेल्या मुलीने जोरात ओरडण्याचा प्रयत्न केला. तिचा आवाज ऐकताच आई तातडीने क्लिनिकमध्ये धावून गेली.
advertisement
यानंतर मुलीने घडलेली संपूर्ण घटना आईला सांगितली. कुटुंबीयांनी क्षणाचाही उशीर न करता जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी डॉक्टर रवी सिंग याच्याविरोधात गुन्हा नोंदवला.
तक्रार दाखल होताच संशयित डॉक्टर फरार
घटनेची माहिती मिळताच आरोपीने आपले क्लिनिक बंद केले आणि तो फरार झाला आहे. पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
