सीएसएमटी स्थानकावर लोकल तब्बल एक तास उशिराने पोहोचते. यामुळे प्रवाशांचे मेगाहाल होत आहेत. दुपारच्या वेळेमध्ये ऑफिस गाठणाऱ्या नोकरदारांचे चांगलेच हाल होत आहेत. खोपोली, कर्जत आणि कसाऱ्याहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फारच त्रास सहन करावा होत आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून मध्य रेल्वेचा कोणत्या कारणामुळे खोळंबा होत आहे, याबद्दल मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला स्पष्टीकरण दिलं आहे, ते म्हणाले की, "दुपारच्या वेळेमध्ये मध्य रेल्वेकडून 15 डब्ब्यांच्या लोकलसाठी सध्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. मार्च 2026 पर्यंतची आम्ही त्या कामासाठी डेडलाईन समोर ठेवली आहे. त्यामुळे सध्या काही लोकल्सना उशीर होत आहे."
advertisement
मुख्य जनसंपर्क अधिकारी पुढे म्हणाले की, "सध्या उत्तर भारतामध्ये थंडीची लाट आहे. त्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणावर धुकं आहे. म्हणून मोठ्या प्रमाणावर उशीराने एक्सप्रेस धावत आहे. त्या उशीरा आल्यामुळे इतर लोकल्सचा खोळंबा होत आहे. कुर्ला ते मुंबई सीएसएमटी या स्थानकादरम्यान चार मार्गिका आहेत. त्यामुळे पुढे जाण्यासाठी लोकल्स आणि एक्सप्रेसला काही प्रमाणात उशीर होतो. 15 डब्बा लोकलसाठी प्लॅटफॉर्मच्या रूंदी वाढवली जात आहे. यामुळे दुपारच्या वेळेमधील लोकलला उशीर होण्याची शक्यता आहे."
