यात बाईकवरून जात असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने एक दीड वर्षांचा चिमुकला खाली पडला. या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बोईसर नवापूर रोडवर ही घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेनंतर संतप्त स्थानिकांनी बोईसरमध्ये रास्ता रोको केला.
Pune hit and run : पुणे पोलीस ‘हिट ॲण्ड रन’ प्रकरणात मोठं ट्विस्ट, तपासात धक्कादायक माहिती
advertisement
माहीर मोशीन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर एमआयडीसी बांधकाम विभागाविरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. एमआयडीसी बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळेच चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी यावेळी रास्ता रोको केला. हा चिमुकला आपल्या आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात असताना खड्ड्यात बाईक आदळली. यावेळी तो बाईकवरुन खाली पडला आणि या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
स्थानिकांचा आरोप आहे, की एमआयडीसी बांधकाम विभागाने रस्त्यांची योग्य देखभाल केली नाही. ज्यामुळे या प्रकारचा गंभीर अपघात घडला आहे. त्यांनी विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि तातडीने योग्य कारवाईची मागणी केली आहे.
