माधव सृष्टीच्या उत्पादनांमध्ये मुख्यतः देशी गायीचे तूप वापरले जाते, ज्यामध्ये सोन्याचे सूक्ष्म अंश (गोल्ड सॉर्ट्स) सापडले आहेत. या तूपाचे फायदे त्वचेला आणि केसांना अत्यधिक लाभकारक आहेत.
मुलाला अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी तिनं रिक्षा चालवली, थक्क करणारा प्रवास...
तूपाचा वापर विविध स्किनकेअर आणि हेयरकेअर प्रोडक्ट्स मध्ये त्यांनी केला आहे. ज्यामध्ये बॉडी योगर्ट, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर, स्किन ब्राइटिंग क्रीम, हेयर सिरम आणि टूथपेस्टसारखी उत्पादने समाविष्ट आहेत.
advertisement
तसेच माधव सृष्टीने आयुर्वेदिक वनस्पतींचा समावेश केला आहे ज्यात आगाढा सारख्या वनसप्तीचा वापर केला जातो. हे प्रोडक्ट्स पूर्णपणे नैसर्गिक आणि शरीरासाठी सुरक्षित आहेत. कंपनीने उटण्याचे सोप, पंचामृत सोप, लिक्विड लिपस्टिक आणि लिपबामसारखी नवीन उत्पादने सुद्धा बाजारात आणली आहेत.
सांगलीतील अनोखी परंपरा, पत्रावळीमध्ये बसवले जातात घट, Video
डॉ. मेघना दलाल माधव सृष्टीच्या संस्थापक, सांगतात की त्यांच्या सर्व प्रोडक्ट्स एफडीए अप्रुव्ड आणि लायसन्स प्राप्त आहेत त्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. त्यांची किंमत १०० रुपये ते ३००० रुपये दरम्यान आहे जे विविध ग्राहकांच्या आवश्यकता आणि बजेटला अनुरूप आहेत.
माधव सृष्टीने देशी गायींच्या तूपाचे उत्पादन आणि पंचगव्यच्या प्रोडक्ट्सना अधिक मान्यता मिळवून देण्याचे आपले ध्येय ठेवले आहे. त्यांच्या उच्च गुणवत्ता असलेल्या प्रोडक्ट्सची खरेदी ग्राहक www.madhavsrushti.com या वेबसाइटवर जाऊन करू शकतात. याशिवाय कंपनी कॉर्पोरेट आणि फेस्टिव गिफ्टिंगसाठी विशेष पॅकेजेस देखील उपलब्ध करून देते.