मुलाला अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी तिनं रिक्षा चालवली, सोलापूरातल्या नवदुर्गेचा थक्क करणारा प्रवास

Last Updated:

Solapur News : सोलापूर शहरात नवदुर्गा महिला रिक्षा चालक शोभा घंटे 2018 पासून सोलापूरात महिला रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहे. एका खाजगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन माऊलीने रिक्षाचा स्टेरिंग हाती घेतलं.

News18
News18
सोलापूर - सोलापूर शहरात नवदुर्गा महिला रिक्षा चालक शोभा घंटे 2018 पासून सोलापूरात महिला रिक्षा चालक म्हणून कार्यरत आहे. एका खाजगी ड्रायव्हिंग स्कूलमध्ये रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण घेऊन माऊलीने रिक्षाचा स्टेरिंग हाती घेतलं. तर अनेक महिला आज नवरात्रीनिमित्त रिक्षावाल्या दीदीची वाट पाहून तिच्या रिक्षात प्रवास करत आहे. पाहूया हा विशेष वृत्तांत.
सोलापूर शहरातील म्हेत्रे वस्तीमध्ये महिला रिक्षाचालक शोभा घंटे राहायला आहे. घराची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. तर शोभा घंटे यांचे पती एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करत होते. पतीच्या पगारावर घर कसे चालवायचं? मुलांचे शिक्षण कसं होणार? हा प्रश्न नेहमी पडत होता. पतीच्या खांद्याला खांदा लावून शोभा घंटे यांनी काम करायचा निर्णय घेतला. एका खाजगी ड्रायव्हिंग स्कुल मधून आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर एका बँकेतून कर्ज घेऊन त्यांनी रिक्षा खरेदी केले आणि आपलं काम जोमानं सुरू केलं. दोन वर्षांपूर्वी शोभा घंटे यांच्या पतीचे निधन झाले.
advertisement
हलाकीच्या परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलाला मोठ्या अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी रिक्षाचा स्टेरिंग कायमस्वरूपी हाती घेतलं. महिला रिक्षाचालक शोभा घंटे यांना पोलीस मध्ये भरती व्हायचं होतं. पोलीस भरतीसाठी अनेक वेळा प्रयत्न केला पण उंची कमी असल्याने ते भरती होऊ शकले नाही. तर 2007 साली त्या होमगार्ड मध्ये भरती झाल्या. परंतु रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेऊन त्यांनी खाकी वर्दी परिधान करून सोलापूरात रिक्षा सेवा देत आहे. प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवण्याचे काम आज शोभा घंटे करत आहे. तर अनेक प्रवासी ड्रायव्हर शोभा यांचा मोबाईल नंबर घेऊन आवडीने त्यांच्या रिक्षातून प्रवास करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मुलाला अधिकारी पदावर पोहोचवण्यासाठी तिनं रिक्षा चालवली, सोलापूरातल्या नवदुर्गेचा थक्क करणारा प्रवास
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement