SSC निकाल 2024 महाराष्ट्र बोर्डाचा आज महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) 10th निकाल 2024 आज, 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध करेल. हा निकाल विद्यार्थी आणि पालक ऑनलाईन mahresult.nic.in पाहू शकता आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर महाराष्ट्र बोर्डाचा 10वीचा निकाल 2024 पाहता येईल. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज म्हणजेच 27 मे 2024 रोजी दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे.
advertisement
खडतर प्रयत्न करून मिळवलंस यश, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा..!
महाराष्ट्र बोर्डाची वेबसाइट क्रॅश झाल्यास, विद्यार्थी डिजीलॉकरवर (10th Result Marksheet On DigiLocker) त्यांची मार्कशीट तपासू शकतात. याशिवाय विद्यार्थ्यांना सरकारी निकाल वेबसाइटवर 10वीचा निकाल पाहण्याचा पर्यायही मिळेल. महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कालच दहावीच्या निकालाची तारीख आणि वेळ याबाबत माहिती दिली होती.
कुठे पाहता येईल निकाल
तुम्ही ऑनलाईन निकाल पाहू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवरुन जाऊन तिथे माहिती अपडेट करायची आहे. विद्यार्थ्याचे सर्व डिटेल्स भरल्यानंतर निकाल पाहता येणार आहे.
1- mahresult.nic.in
2- mahahsscboard.in
3- results.digilocker.gov.in
4- results.gov.in
