सदर बदलामागील मुख्य कारण म्हणजे मुस्लिम संघटनांनी जुलूसाचे आयोजन सोमवार, 8 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 21 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या बैठकीत हे ठरवले होते. त्यामागे एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने होणारी गर्दी टाळणे आणि सार्वजनिक शांतता राखणे. प्रशासनावर विशेषतहा पोलिसांना मोठा ताण येतो, म्हणून जुलूस अनंत चतुर्दशीच्या दिवशी न करता दुसऱ्या दिवशी आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
मुस्लिम संघटनांची विनंती लक्षात घेऊन शासनाने मुंबईसाठी ईद-ए-मिलादची सुट्टी 8 सप्टेंबर रोजी जाहीर केली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना थेट फायदा होणार आहे, कारण शनिवारी आणि रविवार ही नियमित सुट्टी असून आता सोमवारची सुट्टी मिळाल्यामुळे लोकांना सलग तीन दिवसांची सुट्टी मिळणार आहे. अनेक जण या सुट्टीचा फायदा घेऊन घर किंवा शहराबाहेर प्रवास करण्याचा विचार करत आहेत.
महत्वाची बाब म्हणजे ही बदललेली तारीख फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी लागू आहे. महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी मूळतहा शुक्रवार 5 सप्टेंबर 2025 रोजीच राहणार आहे. त्यामुळे राज्यातील इतर भागात नेहमीप्रमाणे शासकीय कामकाज सुरु राहील.
सरकारच्या अधिसूचनेत स्पष्ट करण्यात आले आहे की मुंबईसाठी सुट्टी 8 सप्टेंबर रोजी आहे तर इतर जिल्ह्यांसाठी मूळ तारीख कायम राहील. या निर्णयामुळे शहरातील कामकाजावर फारसा परिणाम होणार नाही.परंतु, नागरिकांना त्यांच्या पारिवारिक किंवा प्रवासी योजना नियोजित करण्याची मुभा मिळणार आहे.
एकूणच मुंबईतील ईद-ए-मिलाद 2025 सुट्टी नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठी सोयीस्कर ठरली आहे. जुलूसाच्या आयोजनास आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी होणाऱ्या गर्दीसंदर्भातील तणाव टाळण्यासाठी ही बदललेली तारीख उचित ठरली आहे.