TRENDING:

पालकवर्गासाठी महत्त्वाची बातमी! ‘ग्लोबल- इंटरनॅशनल’ नावांना ब्रेक; राज्य मंडळाच्या शाळांवर शिक्षण संचालनालयाची कारवाई

Last Updated:

राज्य मंडळाच्या अखत्यारित असलेल्या शाळा पालकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या शाळांना संचालनालयाने माहिती पत्रक जारी करून शाळांच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई आणि इंग्लिश मिडियम असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
राज्याच्या शिक्षण मंडळाने राज्यातल्या शाळांना महत्त्वाची सूचना केली आहे. राज्य मंडळाच्या अखत्यारित असलेल्या शाळा पालकांची दिशाभूल करणाऱ्या किंवा चुकीची माहिती देणाऱ्या शाळांना संचालनालयाने माहिती पत्रक जारी करून शाळांच्या नावांमधून ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई आणि इंग्लिश मिडियम असे शब्द वगळण्याचे निर्देश दिले. शाळेच्या नावामध्ये विनाकारण असलेले हे शब्द काढून टाकण्याचे आदेश संचालनालयाने शाळांना दिले आहेत. ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई आणि इंग्लिश मिडियम या शब्दांमुळे अनेक पालकांची दिशाभूल होते, असे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. यामुळे आता शिक्षण संचालनालयाने महत्त्वाचा नियम जारी केला आहे.
पालकवर्गासाठी महत्त्वाची बातमी! ‘ग्लोबल- इंटरनॅशनल’ नावांना ब्रेक; राज्य मंडळाच्या शाळांवर शिक्षण संचालनालयाची कारवाई
पालकवर्गासाठी महत्त्वाची बातमी! ‘ग्लोबल- इंटरनॅशनल’ नावांना ब्रेक; राज्य मंडळाच्या शाळांवर शिक्षण संचालनालयाची कारवाई
advertisement

महाराष्ट्रामध्ये अशा अनेक शाळा आहेत की, ज्यांच्या नावामध्ये, ग्लोबल, इंटरनॅशनल, सीबीएसई आणि इंग्लिश मिडियम अशा नावांचा समावेश असतो. यामुळे अनेक पालकांची दिशाभूल होते. त्यामुळे अलीकडेच, राज्य शिक्षण संचालनालयाने काढलेल्या पत्रकामध्ये स्पष्ट केले आहे की, हे शब्द फक्त परदेशात शाखा असलेल्या किंवा आंतरराष्ट्रीय बोर्डाशी संलग्न असलेल्या शाळांमध्येच वापरले जाऊ शकतात. या शब्दांमुळे संबंधित शाळा आंतरराष्ट्रीय किंवा केंद्रीय मंडळाशी संलग्न असल्याचा चुकीचा गैरसमज पालकांमध्ये निर्माण झाला आहे. त्यातून शैक्षणिक फसवणुकीचा धोका वाढत असल्याचे शिक्षण संचालनालयाच्या निदर्शनास आले आहे. शिवाय राज्य मंडळाच्या शाळांनी ती नावे शाळांच्या नावात वापरणे योग्य नसल्याचे ही संचालनालयाने स्पष्ट केले आहे.

advertisement

खरंतर, 'सीबीएसई' हा शब्द केवळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत शाळांनाच वापरणे कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. बाकीच्या शाळांना वापरणं चुकीचं आहे. तर, 'इंटरनॅशनल' किंवा 'ग्लोबल' हे शब्द फक्त आयसीएसई बोर्ड असलेल्या शाळांनाच वापरण्यासाठी परवानगी असणार आहे. संबंधित शाळेची परदेशात शाखा किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकृत संलग्नता असणे आवश्यक आहे. त्यांनाच हे शब्द वापरणं कायदेशीरदृष्ट्या योग्य आहे. परंतु, राज्यातील अनेक शाळांकडे अशी कोणतीही पात्रता नसतानाही हे शब्द वापरले जात असल्याचे आढळले. दरम्यान, शिक्षण संचालनालयाने पालक आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल होईल अशी नावे असल्यास ती तात्काळ बदलण्याबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनांना सूचित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी गेली, 2 भावांनी सुरू केला अंडा रोल व्यवसाय, महिन्याची उलाढाल आता लाखात
सर्व पहा

दरम्यान, इतकं करूनही जर शाळांच्या नावांमध्ये असे शब्द आढळल्यास त्यावर कारवाई करण्याचे संकेत देण्यात आले आहे. शिवाय, नव्याने सुरू होणार्‍या शाळांच्या दर्जावाढीसाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या शाळांच्या नावांची काटेकोरपणे तपासणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
पालकवर्गासाठी महत्त्वाची बातमी! ‘ग्लोबल- इंटरनॅशनल’ नावांना ब्रेक; राज्य मंडळाच्या शाळांवर शिक्षण संचालनालयाची कारवाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल