TRENDING:

एप्रिलच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट, राज्यातील या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता, Video

Last Updated:

महाराष्ट्रात 1 एप्रिल रोजी हवामानाची स्थिती काय असणार आहे? याबाबत जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मयुरी सर्जेराव, प्रतिनिधी
advertisement

मुंबई: महाराष्ट्रात सध्या एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे पावसाची शक्यता असं वातावरण आहे. राज्यासह देशाच्या काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार 31 मार्चपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, अमरावती अशा काही शहरांमध्ये पावसाची शक्यता आहे. तर, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तापमानात मोठी वाढ होणार आहे. 1 एप्रिल रोजी महाराष्ट्रात तापमानाची स्थिती काय असणार आहे? याबाबत जाणून घेऊया.

advertisement

मुंबईकर उष्णतेने हैराण

गेल्या काही काळात मुंबईच्या तापमानात सातत्याने वाढ होतेय. 1 एप्रिल रोजी मुंबईतील कमाल तापमान हे 33 ते 34 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. तर किमान तापमान हे 26 अंश सेल्सिअस राहील. मात्र, वातावरणातील उकाड्याने मुंबईकर हैराण झाले आहेत.

वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका? अशी घ्या काळजी, पाहा Video

advertisement

पुण्यात तापमान 40 अंशांवर

पुण्यातील तापमान हे 31 मार्च रोजी 38 ते 39 अंश सल्सिअसच्या घरात आहे. मात्र 1 एप्रिल रोजी कमाल तापमानात वाढ होऊन ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहचण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणेकरांना एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच कडक उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे.

advertisement

नाशिकमध्ये अंशतः ढगाळ वातावरण

नाशिकमध्ये 31 मार्च रोजी ढगाळ वातावरण राहिलं. तर 1 एप्रिल रोजी अंशत: आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. नाशिकमधील कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खावीत का? आहारतज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला

advertisement

कोल्हापूरमध्ये पावसाचा अंदाज

कोल्हापूरमध्ये 31 मार्च रोजी ढगाळ वातावरण राहिले. काही ठिकाणी हलक्या स्वरुपात पाऊस झाला. 1 एप्रिल रोजीही कोल्हापुरातील हवामान हे ढगाळ राहणार असल्याची शक्यता असून कमाल तापमान हे 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस असणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यातही तापमान वाढणार

मराठवाड्यातील संभाजीनगरमध्ये 31 मार्च रोजी ढगाळ वातावरण राहिलं. 1 एप्रिल रोजी मात्र आकाश निरभ्र राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून कमाल तापमानात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 24 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज आहे.

उन्हाळ्यात आहारात समावेश करा ‘हे’ पदार्थ; फिट रहाण्यासाठी होईल मदत

विदर्भात ढगाळ वातावरण

विदर्भातही 31 मार्चपर्यंत पावसाचा अंदाज वर्तवला होता. 1 एप्रिल रोजी देखील नागपूरमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज असून कमाल तापमान 39 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 22 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कडक ऊन तर काही भागात पाऊस असं समिश्र वातावरण अनुभवायला मिळत आहे. तर, हवामान खात्याच्या अंदाजानुसार एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
एप्रिलच्या सुरुवातीलाच उष्णतेची लाट, राज्यातील या जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल