वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका? अशी घ्या काळजी, पाहा Video

Last Updated:

तीव्र उन्हामध्ये काम केल्याने किंवा बाहेर गेल्याने उष्माघात होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे उष्माघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच उष्माघात झाल्यास तातडीने काय उपाययोजना कराव्यात? पाहा

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : राज्यात उष्णतेचा पारा हा सातत्याने वाढत आहे. वातावरणात उकाडा वाढल्याने अनेक जणांना उष्णतेचे वेगवेगळे आजार होतात. तीव्र उन्हामध्ये काम केल्याने किंवा बाहेर गेल्याने उष्माघात होण्याची शक्यता देखील अधिक असते. त्यामुळे तीव्र उन्हामध्ये बाहेर पडताना किंवा कष्टाचे काम करताना आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे उष्माघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? तसेच उष्माघात झाल्यास तातडीने काय उपाययोजना कराव्यात? याबद्दच जालन्यातील ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय डॉक्टर गणेश राठोड यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
उष्माघात होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? 
सध्या उन्हाची तीव्रता ही प्रचंड वाढली आहे. त्यामुळे उष्माघाताचे रुग्ण देखील वाढले आहेत. तापमान वाढल्यामुळेच उष्माघाताची रुग्ण वाढतात हे आपल्याला माहीतच आहे. त्यामुळे कुठलेही काम करायचे असल्यास किंवा उन्हामध्ये बाहेर फिरायचे टाळल्यास आपण उष्माघातापासून स्वतःचा बचाव करू शकतो. खूपच महत्त्वाचे काम असेल तर सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत तसेच संध्याकाळी चार ते त्यापुढील वेळेमध्ये आपण ते काम करू शकतो. जर आपल्याला ताप आली चक्कर येत असेल किंवा डोकेदुखी असेल खूप घाम येत असेल बेचैन अस्वस्थता वाटत असेल तर घाबरून न जाता जवळच्या दवाखान्यात दाखवावे, असं डॉक्टर गणेश राठोड सांगितलं.
advertisement
उन्हाळ्यात फ्रीजमधील थंड फळे खावीत का? आहारतज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
उष्माघात हा काही फार मोठा गंभीर आजार नाही मात्र आपल्या दुर्लक्षामुळे उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं तसेच उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे. उष्माघात होऊ नये म्हणून आपण काळजी घेणे हे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी तीव्र ऊन असताना घराबाहेर जाणे टाळणे. दिवसभरात जास्तीत जास्त पाणी पिणे आवश्यक आहे. याचबरोबर आपल्याला ताप जाणवत असल्यास तापीची पॅरासिटॅमल ही टॅबलेट घेऊ शकतो. त्याचबरोबर घाबरट अस्वस्थता वाटत असेल तर झाडाच्या सावलीमध्ये आराम करू शकतो. शारीरिक दृष्ट्या तुम्ही कमकुवत असाल तर शक्यतो उन्हामध्ये काम करणं टाळाच. यामुळे घबराट बेचैनी अस्वस्थता वाढवून उष्माघाताचा त्रास आणखी वाढू शकतो, असं डॉक्टर गणेश राठोड सांगितलं.
advertisement
उन्हाळ्यात आहारात समावेश करा ‘हे’ पदार्थ; फिट रहाण्यासाठी होईल मदत
या आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आपण फॉलो केल्या पाहिजेत. त्यानंतर दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास आपल्याला आराम मिळू शकतो, असं डॉक्टर गणेश राठोड यांनी सांगितलं. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन देखील त्यांनी केले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका? अशी घ्या काळजी, पाहा Video
Next Article
advertisement
Raj Thackeray : राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!
  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

  • राज ठाकरेंनी जी भीती व्यक्त केली ती १२ तासात खरी ठरली, जुना शिलेदार फुटला!

View All
advertisement