TRENDING:

Home : नवी मुंबईतल्या 'त्या' 72 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत घर, कुणाला संधी, पात्रता काय?

Last Updated:

Navi Mumbai housing scheme : नवी मुंबईतील एका महत्त्वाच्या परिसरातील सुमारे 72 हजार नागरिकांना मोफत घर मिळणार. मात्र यासाठी नेमके कोणते निकष असतील ते जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी मुंबई : मुंबई पाठोपाठ नवी मुंबई शहराचाही मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. पण अजूनही या विकसित होत चाललेल्या शहरात पूर्णपणे झोपडपट्ट्याचा परिसर संपलेला नाही. यामागील कारणही वेगळे वेगळी आहेत. मात्र आता या झोपडीधारकांसाठी आनंदाची बातमी आली असून त्यांनाही त्यांच्या हक्काचे  चांगले घर मिळणार आहे.
Free housing scheme for slum dwellers in Belapur Navi Mumbai
Free housing scheme for slum dwellers in Belapur Navi Mumbai
advertisement

झोपडीधारकांनो अच्छे दिन आले

नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातील पात्र झोपडीधारकांना मोफत घर देण्यात येणार असून अपात्र झोपडीधारकांना केवळ अडीच लाख रुपयांत घराचा मालकी हक्क मिळणार आहे. यासंदर्भात गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली. ही माहिती भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी दिली.

बैठकीत झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. झोपडीधारकांचे सर्वेक्षण, डीएसआर तयार करणे आणि बायोमेट्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तुर्भे येथील शिवाजी नगर भागात GBR प्रक्रिया सुरू झाली असून ती सध्या 3C टप्प्यापर्यंत पोहोचली आहे.

advertisement

नेमका कोणाला मिळणार मोफत मालकी हक्की?

सन 2000 पूर्वीच्या झोपडीधारकांना मोफत मालकी हक्क मिळणार आहे. तर 2000 ते 2011 या कालावधीतल्या झोपडीधारकांना अडीच लाख रुपये भरून घर मिळेल. बेलापूर मतदारसंघातील सुमारे 72,665 झोपडीधारकांना या निर्णयाचा लाभ होणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
35 हजार मीटर दोऱ्याने साकारले शिवराय; सोलापूरच्या तरुणाचं अनोखं 'स्ट्रिंग आर्ट'
सर्व पहा

लवकरच मोठा मेळावा घेऊन नागरिकांना संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले. या निर्णयामुळे तुर्भे, नेरूळ आणि बेलापूर परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
Home : नवी मुंबईतल्या 'त्या' 72 हजार कुटुंबीयांना मिळणार मोफत घर, कुणाला संधी, पात्रता काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल