TRENDING:

Shiv Jayanti 2026: कलेचा आविष्कार! 35 हजार मीटर दोऱ्याने साकारले शिवराय; पाहा सोलापूरच्या तरुणाचं अनोखं 'स्ट्रिंग आर्ट', Video

Last Updated:

Shiv Jayanti 2026: गेल्या वर्षीही मिरजकर यांनी 21 हजार शर्टाच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा तयार केली होती. त्या कलाकृतीची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विविध उपक्रमांतून साजरी केली जाते. सोलापूर शहरातील युवा चित्रकार विपुल मिरजकर यांनी छत्रपती शिवरायांची तब्बल 22 बाय 22 फुटांची भव्य प्रतिमा दोऱ्यापासून साकारली आहे. शिवजन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही आकर्षक प्रतिमा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आली असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
advertisement

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 व्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव मध्यवर्ती मित्र मंडळ आणि सुभाष गुरुजी पवार यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. या प्रतिमेसाठी सुमारे 35 हजार मीटर दोरा वापरण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केवळ दोऱ्याच्या सहाय्याने महाराजांचा चेहऱ्यावरील भाव, दाढी, शिरपेच आणि डोळ्यांतील तेज अत्यंत बारकाईने साकारण्यात आले आहे.

advertisement

Shiv Jayanti 2026: छत्रपती शिवरायांचं मूळ गाव असलेलं संभाजीनगरमधील हे ठिकाण, ‘ती’ गढी आजही देतेय इतिहासाची साक्ष, Video

विपुल मिरजकर यांना ही कलाकृती पूर्ण करण्यासाठी जवळपास 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागला. त्यांना पाच सहकाऱ्यांची साथ लाभली. लोकल 18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, पारंपरिक चित्रकलेपेक्षा वेगळा प्रयोग करण्याचा उद्देश होता आणि शिवप्रेमींसाठी ही कलाकृती अर्पण करण्यात आली आहे.

advertisement

View More

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
35 हजार मीटर दोऱ्याने साकारले शिवराय; सोलापूरच्या तरुणाचं अनोखं 'स्ट्रिंग आर्ट'
सर्व पहा

दरम्यान, मागील वर्षीही त्यांनी 21 हजार शर्टाच्या बटनांपासून महाराजांची प्रतिमा तयार केली होती. त्या कलाकृतीची वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली होती. यंदाच्या या 22 फुटी दोऱ्याच्या प्रतिमेचीही वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे. शहरात या अनोख्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Shiv Jayanti 2026: कलेचा आविष्कार! 35 हजार मीटर दोऱ्याने साकारले शिवराय; पाहा सोलापूरच्या तरुणाचं अनोखं 'स्ट्रिंग आर्ट', Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल