शेतकरी कुटुंबानं महाराष्ट्राचं मन जिंकलं! ‘मयुरी’चं डोहाळे जेवण असं केलं, की सगळीकडे चर्चा, Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Solapur News: सोलापूरच्या हराळवाडीतील शेतकऱ्यानं चक्क लाडक्या गाईचं डोहाळे जेवण घातलं. पाटील कुटुंबानं केलेल्या या अनोख्या सोहळ्याची सर्वत्र चर्चा आहे.
सोलापूर: एखादी विवाहित तरुणी गरोदर राहिली की तिचे डोहाळे पुरवण्याचा कार्यक्रम होतो. अगदी साडी-चोळीपासून ते तिला खायला आवडणारं सगळं तिला दिलं जातं. आपल्यापैकी सगळ्यांनाच असा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम माहिती असेल. परंतु, सोलापूर जिल्ह्यातील मोहोळच्या हराळवाडीत अनोखं डोहाळे जेवण झालं. शेतकरी संतोष पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांनी चक्क गाईचं डोहाळे जेवण घातलं. आता या कार्यक्रमाची अख्ख्या पंचक्रोशित चर्चा आहे.
संतोष पाटील यांच्या घरी पूर्वी कोणताही पाळीव प्राणी नव्हता. त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांनी त्यांना संगोपनासाठी गायीचे वासरू दिले. त्या वासराचे नाव त्यांनी ‘मयुरी’ असे ठेवले. मयुरीला कुटुंबातील सदस्याप्रमाणेच जपले. तिच्या संगोपनात पाटील कुटुंबाने माया आणि आपुलकीची भावना जपली. मयुरी गरोदर राहिल्यानंतर तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याचा निर्णय पाटील कुटुंबीयांनी घेतला.
advertisement
कसं केलं डोहाळे जेवण?
डोहाळे जेवणाच्या दिवशी मयुरीला अंघोळ घालून स्वच्छ सजवण्यात आले. तिच्या शिंगांना रंग लावण्यात आला तसेच फुलांच्या माळांनी तिला सजवले. अंगणात सुंदर रांगोळी काढून पारंपरिक लोकगीतांच्या सुरावटीत मयुरीची ओटी भरली गेली. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे तिच्यासाठी तयार करण्यात आलेला खास नैवेद्य. पुरणपोळी, हिरवा चारा आणि ताजी फळे प्रेमाने खाऊ घालण्यात आली.
advertisement
विशेष म्हणजे ‘मयुरी’च्या या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमांसाठी पै-पाहुणे आणि आया-बाया देखील जमल्या होत्या. या सगळ्यांनी आरती करून मयुरीला आशीर्वाद दिले. उपस्थित ग्रामस्थांसाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली होती. मुक्या प्राण्याप्रती दाखवलेली ही आपुलकी आणि जिव्हाळा पाहून पाटील कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या धावपळीच्या काळात भूतदयेचा आणि संवेदनशीलतेचा हा आदर्श संदेश ठरत आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 12:53 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
शेतकरी कुटुंबानं महाराष्ट्राचं मन जिंकलं! ‘मयुरी’चं डोहाळे जेवण असं केलं, की सगळीकडे चर्चा, Video








