'मला आणि माझ्या पत्नीला काही झालं तर...' 10 वर्षांची मेहनत एका रात्रीत हिरावून घेतली, सोशल मिडिया अकाऊंट्स सस्पेंडनंतर 'प्रसिका'ची पोस्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
UIC, Prasika या नावांनी सोशल मीडियावर हिट असलेली जोडी प्रसाद आणि दीपिका यांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सस्पेंड करण्यात आलेत. या प्रकारानंतर प्रसाद वेदपाठकने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
प्रसादनं लिहिलंय, "जर माझ्या किंवा माझ्या पत्नीबाबत काहीही घडलं तर कोणतीही पूर्वसूचना न देता आमची सर्व अकाउंट्स एकाच वेळी सस्पेंड केल्याबद्दल फक्त Instagram आणि Meta जबाबदार असतील. आम्हाला अपील करण्याची किंवा आमची बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली नाही. अनेक दशकांची मेहनत एका क्षणात पुसून टाकल्यासारखी झाली."
advertisement
advertisement
प्रसाद आणि दीपिका यांची सुरुवात UIC या युट्यूब व्लॉगमधून झाली होती. टिकटॉकच्या काळातही ते प्रचंड लोकप्रिय होते. टिक टॉक बंद झाल्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर प्रसिका नावाने अकाऊंट सुरू केलं ज्यात त्याला प्रचंड लोकप्रियता मिळता. प्रसिका या चॅनेलवर कुकींग व्हिडीओ ते शेअर करत होते. मार्केटिंग क्षेत्रातही त्यांनी मोठं नाव कमावलं.
advertisement










