advertisement

पॉश एरिया, सोपा प्रवास अन् एकदम कमी भाडं, मुंबईत राहण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाणं

Last Updated:

Property : मुंबई ही स्वप्नांची नगरी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. देशभरातून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी लाखो लोक मुंबईकडे येतात.

property rules
property rules
मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. देशभरातून नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणासाठी लाखो लोक मुंबईकडे येतात. मात्र, या शहरात राहण्याचा सर्वात मोठा खर्च म्हणजे घरभाडे. आज घडीला शहराच्या मुख्य भागात अगदी लहान १ BHK किंवा २ BHK फ्लॅटसाठीही ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत मासिक भाडे मोजावे लागते. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबे आणि तरुण व्यावसायिकांसमोर घर शोधणे हे मोठे आव्हान बनले आहे.
वाढते भाडे आणि उपनगरांकडे वळण
मुंबईतील दक्षिण मुंबई, वांद्रे, अंधेरी, घाटकोपर यांसारख्या भागांमध्ये भाड्याचे दर गगनाला भिडले आहेत. परिणामी, अनेक मध्यमवर्गीय कुटुंबे आणि नोकरी करणारे लोक उपनगरांचा पर्याय निवडत आहेत. थोडेसे अंतर वाढले तरी परवडणारे भाडे, चांगल्या सुविधा आणि कनेक्टिव्हिटी मिळत असल्याने उपनगरीय भाग अधिक आकर्षक ठरत आहेत.
मॅजिकब्रिक्सचा अभ्यास काय सांगतो?
रिअल इस्टेट क्षेत्रातील आघाडीचे व्यासपीठ असलेल्या Magicbricks च्या अभ्यासानुसार, मुंबई महानगर परिसरात काही असे भाग आहेत जिथे १५,००० ते ४०,००० रुपयांच्या बजेटमध्ये चांगल्या सोयी-सुविधांसह घरे उपलब्ध आहेत. या भागांची निवड प्रामुख्याने रेल्वे, मेट्रो, महामार्ग यांसारख्या कनेक्टिव्हिटी, विकसित होत असलेले इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुलनेने कमी भाडे या निकषांवर करण्यात आली आहे.
advertisement
मीरा रोड
मीरा रोड हा पश्चिम उपनगरातील वेगाने विकसित होणारा भाग मानला जातो. वेस्टर्न रेल्वे मार्गावर असल्यामुळे चर्चगेटपर्यंत थेट लोकल ट्रेन सेवा उपलब्ध आहे. तसेच वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि प्रस्तावित मेट्रो प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ होत आहे. येथे २ BHK फ्लॅटसाठी सरासरी भाडे ३०,००० ते ३५,००० रुपयांच्या दरम्यान असून, डिपॉझिट साधारणपणे एक लाख रुपयांपर्यंत असतो. शाळा, कॉलेज, रुग्णालये आणि बाजारपेठ जवळ असल्याने मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी मीरा रोड हा संतुलित पर्याय मानला जातो. मात्र, मुख्य मुंबईपासूनचे अंतर हा एकमेव तोटा मानला जातो.
advertisement
पनवेल
पनवेल हा नवी मुंबई परिसरातील सर्वात परवडणारा आणि वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो. येथे १ BHK फ्लॅटसाठी १२,००० ते १५,००० रुपये, तर २ BHK साठी २०,००० ते २५,००० रुपयांपर्यंत भाडे मिळू शकते. पनवेल हे सेंट्रल आणि हार्बर रेल्वे लाईनवरील महत्त्वाचे स्टेशन आहे. तसेच मुंबई–पुणे एक्सप्रेसवे, एसटी बस सेवा आणि आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागाचे महत्त्व आणखी वाढत आहे. सध्या अंतर हा मुद्दा असला तरी भविष्यातील विकास पाहता पनवेलमध्ये राहणे दीर्घकालीन दृष्टीने फायदेशीर ठरू शकते.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पॉश एरिया, सोपा प्रवास अन् एकदम कमी भाडं, मुंबईत राहण्यासाठी सर्वात बेस्ट ठिकाणं
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement