advertisement

Breakfast Recipe : रोज पोहे-उपमा खाऊ बोअर झालात? नाश्त्यात करा झटपट बनणारा दालफरा! सोपी आहे रेसिपी

Last Updated:

Easy Dalfara recipe for breakfast : आज आम्ही तुमच्यासाठी एकदम सोपी, झटपट बनणारी आणि पोटासाठी एकदम हलकी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. या रेसिपीचं नाव जितकं युनिक आहे, तितकीच वेगळी आणि जबरदस्त या रेसिपीची चव आहे.

नाश्त्यासाठी सोपी दालफरा रेसिपी
नाश्त्यासाठी सोपी दालफरा रेसिपी
मुंबई : रोज नाश्त्यामध्ये आपण पोहे, उपमा, इडल्या असं काहीतरी खातो. हे पदार्थ तसेच बनवायला सोपे असतात. पण रोज तेच तेच खाऊन बऱ्याचदा बोअर होतं. शिवाय पराठे नाश्त्यामध्ये हेव्ही होऊन जातात. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एकदम सोपी, झटपट बनणारी आणि पोटासाठी एकदम हलकी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत.
या भन्नाट रेसिपीचं नाव आहे दालफरा. तुम्ही कदाचित हे नाव ऐकलं नसेल. पण या रेसिपीचं नाव जितकं युनिक आहे, तितकीच वेगळी आणि जबरदस्त या रेसिपीची चव आहे. इंस्टाग्रामवर sm.katta या अकाऊंटवर ही रेसिपी दिली गेली आहे. चला तर मग पाहूया झटपट दालफरा कसा बनवायचा.
दालफरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य..
- रवा
- भिजवलेली चण्याची डाळ
advertisement
- तिखट
- मीठ
- जिरे
- आलं
- लसूण
- हिरवी मिरची
- कोथिंबीर
- तेल
- पाणी
- मोहरी
- कढीपत्ता
दालफरा बनवण्याची कृती..
- सर्वात आधी रवा घ्या. त्यामध्ये थोडं मीठ आणि पाणी घालून थोडा वेळ भिजवून ठेवा. 2 मिनिटांनी याचा कणकेसारखा गोळा तयार करून घ्या.
- आता मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चण्याची डाळ घ्या. त्यामध्ये आलं, लसूण, मीठ, मिरची, जिरे टाकून थोडं रावेदार किंवा दाणेदार वाटून घ्या.
advertisement
- मिश्रण तयार झाल्यावर त्यामध्ये भरपूर कोथिंबीर घाला.
- आता भिजवलेल्या रव्याचा गोळा घ्या आणि चांगला जाडसर लावून घ्या.
- लाटलेल्या भागातून वाटीने जितके निघतील तितके छोटेछोटे गोल भाग काढून घ्या.
- यानंतर मिक्सरमध्ये बनवलेलं मिश्रण त्या गोल भग्नावर ठेऊन त्याला टाकोजसारखा शेप द्या आणि व्यवस्थित मिश्रण दाबून घ्या.
- आता हे बनवलेले दालफरे 20 मिनिटांसाठी वाफवून घ्या.
advertisement
- 20 मिनिटानंतर हे पूर्णपणे तयार होतात. तुम्ही हे दालफरे अशाप्रकारेही खाऊ शकता.
- तुम्हाला फक्त वाफवलेले दालफरे खायचे नसल्यास तुम्ही तुपाला छान ताकद देऊन ते तिखटही बनवू शकता.
- एका कढईमधे तेल घ्या त्यामध्ये मोहरी आणि कढीपत्ता घाला. नंतर तयार दालफरे घाला आणि वरूनतिखट मीठ घालून ते व्यवस्थित परतून घ्या.
advertisement



 










View this post on Instagram























 

A post shared by Seema Marathe (@sm.katta)



advertisement
ही एक अत्यंत युनिक आणि चवदार रेसिपी आहे. तितकीच ती हेल्दीही आहे. मुलांच्या डब्यासाठी तर उत्तम पर्याय आहे. एकदा हे घरी नक्की बनवून पाहा.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Breakfast Recipe : रोज पोहे-उपमा खाऊ बोअर झालात? नाश्त्यात करा झटपट बनणारा दालफरा! सोपी आहे रेसिपी
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement