advertisement

Skin Care Tips : चेहऱ्यावर रेझर वापरता? मग काळजी घेणं आवश्यक; या 5 चुका टाळा, नाहीतर त्वचेचे होईल नुकसान

Last Updated:
5 mistakes to avoid while using razor on face : बऱ्याच मुली आपल्या चेहऱ्यावरचे नको असलेले केस काढून टाकण्यासाठी रेझर वापरतात. याने चेहरा स्वच्छ आणि तेजस्वी दिसतो. पण हीच सवय तुम्हाला चुकीचे परिणामही देऊ शकते. रेझरचा वापर करताना काही गोष्टी टाळणं आवश्यक आहे. चला पाहूया ते काय..
1/9
आपण आपल्या चेहऱ्याची सर्वात जास्त काळजी घेतो. वेगवेगळी क्रीम्स लावणं, वेळोवेळी चेहरा साफ करणं, त्यासाठी वेगवेगळे फेस पॅक वापरणं.. आणि म्हणूनच रेझर थेट आपल्या चेहऱ्यावर वापरताना खूप काळजी घेणं आवश्यक आहे. काही चुका करणं आपण टाळलं पाहिजे. चला पाहूया कोणत्या.

2/9
योग्य रेझरची निवड : चेहऱ्यासाठी वेगळे रेझर डिझाईन केले गेलेले आहेत. त्यामुळे चुकूनही किंवा घाईत असताना चेहऱ्यावर कधीही बॉडी रेझर वापरू नका. रेझर नेहमी लहान, बारीक आणि तीक्ष्ण ब्लेड असलेले असावे.

3/9
नवे रेझर वापरा : चेहऱ्यावर प्रत्येकवेळी नवे रेझर वापराने आवश्यक असते. कारण जुन्या ब्लेडमुळे त्वचेवर जळजळ होऊ शकते. म्हणून काहीतरी वापरण्याची गरज पडल्यास रेझरच्या ब्लेडवर बॅक्टेरिया वाढू नयेत म्हणून वापरण्यापूर्वी आणि नंतर सॅनिटायझर किंवा अल्कोहोलने रेझर स्वच्छ करा.

4/9
चेहरा एकदम कोरडा नसावा : रेझर वापरण्यापूर्वी तुमचा चेहरा एकदम कोरडा नसावा. कारण असे असल्यास यामुळे जळजळ आणि रेझर बर्न होऊ शकते. म्हणून तुमचा चेहरा आधी फेसवॉशने धुवा. त्यानंतर शेव्हिंग सोपे होण्यासाठी कोरफड, फेशियल ऑइल किंवा चांगले मॉइश्चरायझर लावा. यामुळे रेझोरचे कामही हिते आणि त्यापासून त्वचा सुरक्षितही राहाते.

5/9
योग्य पद्धतीने शेव्ह करा : चेहरा शेव्ह करण्यासाठी योग्य पद्धत फॉलो करा. रेझर नेहमी ४५ अंशाच्या कोनात धरा, ते त्वचेवर जास्त दाबू नका, सौम्य-लहान स्ट्रोक वापरा, केस जसे वाढतात त्याचा डिशेसने शेव्ह करा. कारण विरुद्ध दिशेने शेव्ह केल्यास केस वेगाने वाढू शकतात. तसेच शेव्ह करताना त्वचेला दुसऱ्या हाताने खेचून ठेवा. जेणेकरून ब्लेड सहज त्वचेवर चालू शकेल आणि कट लागण्याची शक्यता कमी होईल.

6/9
शेव्ह केल्यानंतर त्वचेची छिद्र उघडतात. म्हणून त्वचेला आराम देण्यासाठी चेहरा थंड पाण्याने धुवा. शेव्ह केल्याच्या दिवशी व्हिटॅमिन सी किंवा AHA/BHA किंवा रेटिनॉल सारख्या कोणत्याही रासायनिक एक्सफोलिएंट्सचा वापर करणं टाळा. कारण यामुळे जळजळ होऊ शकते.

7/9
शेव्ह केल्यानंतर त्वचा सुरक्षित आणि जळजळमुक्त राहावी, यासाठी चेहरा चांगल्या हायड्रेटिंग मॉइश्चरायझर किंवा कोरफडीच्या जेलने व्यवस्थित हायड्रेट करा. हायड्रेशनची ही स्टेप खूप शेव्ह केल्यानंतर खूप महत्त्वाची असते.

8/9
या काळात फेस शेव्ह करणं टाळा : तुमच्या चेहऱ्यावर मुरुमे, कट, कसलीही दुखापत किंवा इतर कोणताही त्वचेचा संसर्ग झाला असेल तर चेहऱ्यावर रेझर वापराने टाळा. कारण यामुळे चेहऱ्यावर बॅक्टेरिया पसरू शकतात.

9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement