Team India : गेम बजाना पडेंगा...! सूर्या आणि कुलदीपच्या भांडणाचा विषय मिटला पण हार्दिकचं काय? ड्रेसिंग रुममध्ये टेन्शन?
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Suryakumar Yadav Kuldeep Yadav Fight : टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या वादावर आपल्या खास शैलीत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून कुलदीपची समजूत काढली आहे.
Suryakumar Ends fight with Kuldeep Yadav : टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये पारंपारिक दुश्मन पाकिस्तानविरुद्ध 61 रन्सनी दणदणीत विजय मिळवला. कोलंबोमध्ये झालेल्या या हाय-व्होल्टेज मॅचमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव केला. या विजयाचा जल्लोष संपूर्ण देशात साजरा होत असतानाच, मैदानातील भारतीय खेळाडूंमधील अंतर्गत वादाची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव यांच्यात वाद झाला होता. एका कॅचमुळे टीम इंडियामध्ये उभी फुट पडल्याचं दिसून आलं होतं. तर सूर्या देखील कुलदीपवर भडकला होता.
'हेरा फेरी' चित्रपटातील'बाबू भैया' चा डायलॉग
टीम इंडियातील वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याने या वादावर आपल्या खास शैलीत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असून कुलदीपची समजूत काढली आहे. सूर्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर करून वातावरण हलके केले आहे. या व्हिडिओमध्ये सूर्या आणि कुलदीप एकमेकांशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, या व्हिडिओच्या बॅकग्राउंडला 'हेरा फेरी' चित्रपटातील प्रसिद्ध 'बाबू भैया' या पात्राचा डायलॉग वाजत आहे, ज्यामुळे चाहत्यांना हसू आवरत नाहीये.
advertisement
Gussa chodh do bhai @imkuldeep18 pic.twitter.com/gZ8lnxeQ8o
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) February 16, 2026
नेमकं काय झालं होतं?
मॅच संपवण्यासाठी सूर्यकुमार यादवने आपला स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या याच्यावर पुन्हा विश्वास दर्शवला. हार्दिक पांड्याला 18 वी ओव्हर देण्यात आली होती. हार्दिक पंड्या या ओव्हरमध्ये शाहीन आफ्रिदीला बॉलिंग करत होता. ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आफ्रिदीने एक हवेत शॉट मारला, जो सरळ कुलदीप यादवच्या दिशेने गेला. कुलदीपने तो सोपा कॅच पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या हातातून बॉल निसटला आणि थेट बाउंड्रीच्या बाहेर जाऊन पडला. पाकिस्तानला यामुळे सहा रन्स मिळाले अन् हार्दिक भडकला.
advertisement
ओव्हरच्या दुसऱ्या बॉलनंतर हार्दिकने कुलदीपला यावेळी काहीच बोललं नाही. हार्दिक सूर्यकुमारवर भडकला. कुलदीपला थर्ड मॅनला ठेव, असं हार्दिकने सूर्याला सांगितलं. त्यानंतर सूर्याने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हार्दिकने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर 11 वा खेळाडू असणाऱ्या उस्मान तारिकचा बोल्ड काढला अन् टीम इंडियाने मॅच जिंकली. मात्र, इथंच राडा सुरू झाला.
advertisement
हँडशेक करण्यासाठी टीम इंडिया जमली असताना हार्दिक पांड्याने कुलदीप यादवला धारेधर धरलं अन् कॅच सोडण्यावरून त्याला झाप झाप झापलं. त्यावेळी कुलदीप काहीसा नरमलेला दिसत होता. तर रिंकु सिंगने मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. तर पुढे कॅप्टन सूर्यासोबत हँडशेक करताना देखील सूर्याने कुलदीप यादवकडे रागाने पाहून त्याचा समाचार घेतला. त्यामुळे टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये काहीचं चिंतेचं वातावरण होतं. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 17, 2026 9:40 AM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Team India : गेम बजाना पडेंगा...! सूर्या आणि कुलदीपच्या भांडणाचा विषय मिटला पण हार्दिकचं काय? ड्रेसिंग रुममध्ये टेन्शन?








