advertisement

Gold Silver Rate:सोन्या-चांदीच्या किंमती कोसळल्या! चांदीत सर्वात मोठी घसरण

Last Updated:
Gold Silver Prices Today: आज सोनं आणि चांदीच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचा भाव 1 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. चांदीचा भावही आज MCX वर खाली आला आहे. चांदीच्या भावात आज मोठी घसरण पाहायला मिळतेय.
1/8
Gold Silver Latest Rate Today: देशांतर्गत आणि परदेशी बाजाराचे संकेत, अमेरिकन डॉलरची मजबुती , व्याजदरांमध्ये बदलाची आशा आणि मागणी आणि पुरवठ्यातील संतुलनामुळे सोने आणि चांदी या मौल्यवान धातूंच्या किमतींवर परिणाम होत आहे. सध्याच्या दिवसात मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच MCX वर सोनं आणि चांदी दोन्हीमध्ये वेगवान चढ-उतार पाहायला मिळत आहेत. कधी मोठी घसरण तर कधी तेजी पाहायला मिळतेय. यामुळे बाजारात खुप अस्थिरता वाढली आहे.

2/8
आज सोनं आणि चांदीच्या भावात घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याचा भाव 1 हजार रुपयांनी स्वस्त होऊन एमसीएक्सवर 153753 रुपये प्रति 10 ग्रामवर आला आहे. या व्यतिरिक्त चांदीचा भाव आज 17 फेब्रुवारीला 4 हजार रुपयांनी खाली आला आहे. चांदीचा भाव 235773 रुपये प्रति किलोग्रामवर आला आहे.

3/8
यापूर्वी म्हणजेच मंगळवारी सोन्याच्या किंमतीत जवळपास 1 टक्क्यांची घसरण आली होती. याचं प्रमुख कारण लूनर न्यू ईयरमुळे सुट्ट्या होत्या हे मानलं गोलं होतं. चीनसारख्या देशांमध्ये सुट्ट्या असल्याने प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये व्यवहार मंदावले, ज्यामुळे व्यापार मंदावला.

4/8
सोबतच मजबूत अमेरिकन डॉलरनेही सोन्यावर दबाव टाकला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.9 टक्क्यांनी कोसळून 4,947.98 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स एप्रिल डिलिव्हरीसाठी 1.6 टक्के कोसळून 4,966.80 डॉलर प्रति औंसवर आला आहे.

5/8
आजचे सोने आणि चांदीचे दर : कॉमेक्सवर आज सोन्याच्या किमती घसरल्या. सोन्याच्या किमती -1.51% घसरल्या, ज्यामुळे किंमत 4970.80 डॉलर प्रति औंसवर पोहोचली. चांदीच्या किमतीही घसरल्या, 3.80% घसरून 75.00 डॉलर औंस झाल्या.

6/8
यापुढेही सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण सुरुच राहणार? : सोनं आणि चांदीच्या किंमतींवर सध्या नफा बुकिंगचा दबाव आहे. सोबतच बाजाराची नजर अमेरिकेच्या पर्सनल कंजम्पशन एक्सपेंडिचर (PCE) चे आकडे आणि फेडरल ओपन मार्केट कमेटी (FOMC) च्या बैठकीच्या कृतीवर अवलंबून आहे.

7/8
या कारणांमुळे त्यांची गती थोडी मंदावली आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​उपाध्यक्ष (ईबीजी - कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) प्रणव मीर म्हणाले की, सोने आणि चांदीच्या किमती काही काळ मर्यादित मर्यादेत चढ-उतार होत राहू शकतात. ते म्हणाले की, बाजार अमेरिकेच्या जीडीपीचे आकडे, पीसीई चलनवाढीचा डेटा आणि फेडरल रिझर्व्ह अधिकाऱ्यांच्या टिप्पण्यांवर बारकाईने लक्ष ठेवेल, ज्यामुळे सतत अस्थिरता येऊ शकते. त्यांच्या मते, सध्या व्यापाऱ्यांमध्ये कोणतीही स्पष्ट दिशा नाही, त्यामुळे बुलियन मार्केट एकत्रीकरणाच्या टप्प्यात आहे. किमतींच्या पुढील दिशेबद्दल गुंतवणूकदारांमध्ये मतभेद आहेत आणि ते नवीन मजबूत संकेतांची वाट पाहत आहेत.

8/8
सोनं हे नेहमीपासूनच सुरक्षित गुंतवणूक मानलं जातं. लोक अनिश्चित काळात सोन्या-चांदीत पैसे गुंतवतात. तर चांदीच्या किंमती औद्योगित मागणी आणि गुंतवणूक दोन्हींमुळे प्रभावित होते. यामुळेच चांदीमध्ये जास्त वेगाने बदल येतात. एक्सपर्ट्स म्हणतात की, जागतिक आर्थिक स्थितीमध्ये अनिश्चितता, प्रॉफिट बुकिंग म्हणजेच नफा वसुली, डॉलरची ताकद आणि आंतरराष्ट्रीय बाजारात ट्रेडचा थेट परिणाम भारताच्या बाजारवर पडतो.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement