advertisement

30 मिनिटांचा CPR अन् मृत्यूलाही हार मानावी लागली! महिला डॉक्टरच्या जिद्दीचा रुग्णाला जीवदान

Last Updated:

महिला डॉक्टरने ICU मध्ये ३० मिनिटं सतत CPR देऊन रुग्णाचा जीव वाचवला. तिच्या समर्पणाचा व्हिडिओ जगभर व्हायरल असून, नेटकऱ्यांनी तिला देव मानलं आहे.

News18
News18
डॉक्टरांना देव म्हणतात, ते का हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर समजेल. याचं जिवंत उदाहरण देणारा एक व्हिडिओ सध्या काळजाचा ठोका चुकवणारा आहे. समोर मृत्यू उभा आणि हृदयाचे ठोके थांबलेलं असताना, एक महिला डॉक्टर हार मानायला तयार नव्हती. तब्बल ३० मिनिटं त्या डॉक्टरांचे हात रुग्णाच्या छातीवर पडत होते आणि अखेर विज्ञानाने नव्हे, तर एका डॉक्टरच्या 'जिद्दीने' चमत्कार घडवला. ३० मिनिटांच्या अथक धडपडीनंतर त्या महिलेचे प्राण वाचले असून, या धाडसाचा व्हिडिओ आता जगभर व्हायरल होत आहे.
ती ३० मिनिटं अन् सुन्न करणारं रुग्णालय!
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसतंय की, एका महिलेला रुग्णालयात दाखल केलं होतं, पण तिची प्रकृती इतकी खालावली की तिचं हृदय धडधडण्याचं थांबलं. मेडिकल भाषेत सांगायचं तर ती महिला मृत्यूच्या दारात होती. मात्र, तिथे असलेल्या महिला डॉक्टरने आशा सोडली नाही. त्यांनी तातडीने सीपीआर द्यायला सुरुवात केली. सामान्यतः ५-१० मिनिटांनंतर शरीर साथ देत नाही, पण या डॉक्टरने चक्क ३० मिनिटांपर्यंत ही प्रक्रिया सुरू ठेवली. सलग अर्धा तास त्या महिलेच्या हृदयाला कृत्रिमरीत्या पंपिंग करण्यात आलं आणि अचानक रुग्णाच्या शरीरात हालचाल झाली.
advertisement
नेटकरी म्हणाले, हा तर साक्षात देवच
हा व्हिडिओ कुठल्या रुग्णालयातील आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, पण त्या महिला डॉक्टरच्या समर्पणाने नेटकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. ३० मिनिटं सतत सीपीआर देणं ही शारीरिक थकवणारी गोष्ट आहे, पण रुग्णाला वाचवण्याच्या ओढीने या डॉक्टरला थकवा जाणवला नसावा," अशा शब्दांत सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होतंय.
advertisement
advertisement
जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके अचानक बंद पडतात, तेव्हा छातीवर जोरात दाब देऊन हृदय पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न केला जातो, यालाच सीपीआर (Cardio-Pulmonary Resuscitation) म्हणतात. या डॉक्टरच्या प्रसंगसावधामुळे एका महिलेला पुनर्जन्म मिळाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
30 मिनिटांचा CPR अन् मृत्यूलाही हार मानावी लागली! महिला डॉक्टरच्या जिद्दीचा रुग्णाला जीवदान
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement