advertisement

Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; भारतात दिसणार का? कुठे कसा परिणाम

Last Updated:

Surya Grahan 2026: सूर्यग्रहण साधारण साडेचार तास चालणार आहे. या ग्रहणाचं खास आकर्षण म्हणजे रिंग ऑफ फायर. जेव्हा चंद्र सूर्याचा सुमारे 96 टक्के भाग झाकून टाकतो, तेव्हा सूर्याची फक्त बाहेरची कड चमकताना दिसते. हे दृश्य सुमारे सव्वा दोन मिनिटं दिसेल.

News18
News18
मुंबई : 2026 सालचं पहिलं सूर्यग्रहण आज लागत आहे. विज्ञान आणि ज्योतिष या दोन्ही क्षेत्रांत या घटनेला खूप महत्त्व आहे. विज्ञानासाठी ही एक खगोलीय घटना आहे, तर ज्योतिषात सूर्याला ऊर्जा आणि नेतृत्वाचे प्रतीक मानले गेल्यामुळे त्यावर ग्रहण लागणं ही विशेष बाब ठरते. यावेळी हे ग्रहण कुंभ राशीत आणि धनिष्ठा नक्षत्रात लागत आहे.
भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण दुपारी 3 वाजून 26 मिनिटांनी सुरू होईल. संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटांनी ते मध्य स्थितीत असेल आणि 7 वाजून 57 मिनिटांनी संपेल. म्हणजे हे ग्रहण साधारण साडेचार तास चालणार आहे. या ग्रहणाचं खास आकर्षण म्हणजे रिंग ऑफ फायर. जेव्हा चंद्र सूर्याचा सुमारे 96 टक्के भाग झाकून टाकतो, तेव्हा सूर्याची फक्त बाहेरची कड चमकताना दिसते. हे दृश्य सुमारे सव्वा दोन मिनिटं दिसेल. मात्र, हे सुंदर दृश्य भारतातून दिसणार नाही.
advertisement
आता राहिला प्रश्न सुतकाचा, तर हे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे इथे सुतक पाळण्याची काहीच गरज नाही. शास्त्रानुसार ग्रहण जिथे दिसतं, तिथेच त्याचे नियम लागू होतात. त्यामुळे आज आपली मंदिरं उघडी राहतील, खाण्यापिण्यावर कसलीही बंधनं नसतील आणि गर्भवती महिलांनीही अजिबात काळजी करण्याचं कारण नाही. हे ग्रहण प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, टांझानिया, अंटार्क्टिका आणि दक्षिण अमेरिकेच्या काही भागात दिसेल. तिथे राहणाऱ्या भारतीयांनी मात्र स्थानिक वेळेनुसार नियम पाळायला हरकत नाही.
advertisement
ज्योतिषशास्त्राच्या नजरेतून पाहिलं तर हे ग्रहण मिथुन लग्नात होत आहे. मिथुन लग्नाचा संबंध संवाद आणि माध्यमांशी असतो, त्यामुळे काही ज्योतिष तज्ज्ञांच्या मते इंटरनेट, मोबाईल नेटवर्क किंवा सॅटेलाईट यंत्रणेत थोड्या तांत्रिक अडचणी येऊ शकतात. तसेच भारताच्या कुंडलीनुसार शासन आणि प्रशासनाशी संबंधित विषयांची चर्चा वाढू शकते. ग्रहणाच्या वेळी मंगल ग्रह अस्त असल्यामुळे वादविवादाची तीव्रता कमी असेल आणि गोष्टी समजुतीने सोडवता येतील, असा अंदाज आहे.
advertisement
सूर्य आणि राहू कुंभ राशीत एकत्र असल्यामुळे काही लोकांना निर्णयांबाबत थोडा संभ्रम वाटू शकतो. विशेषतः कुंभ राशीच्या लोकांनी पुढचा एक महिना आर्थिक किंवा मालमत्तेचे व्यवहार करताना विचारपूर्वक पावलं उचलावीत. ग्रहण संपल्यानंतर स्नान करून यथाशक्ती दान देणं शुभ मानलं जातं, पण हे सर्वस्वी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे. भारतात हे ग्रहण दिसत नसल्यामुळे घाबरून न जाता नेहमीसारखा आपला दिवस आनंदाने घालवायला काहीच हरकत नाही.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Surya Grahan 2026: आज बरोब्बर 3 वाजून इतक्या मिनिटांनी पहिलं सूर्यग्रहण; भारतात दिसणार का? कुठे कसा परिणाम
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement