advertisement

आग...आग... दृश पाहून काळजात धस्स झालं, घाबरुन प्रवाशांनी ट्रॅकवरच टाकल्या उड्या, घटनास्थळावरचे PHOTO

Last Updated:
वर्धा जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला दहेगाव-गोसावी स्थानकादरम्यान आग लागली, लाखो रुपयांचे नुकसान झाले, जीवितहानी नाही, शॉर्ट सर्किट कारण असल्याचा अंदाज.
1/6
वर्धा जीटी एक्सप्रेसमध्ये आज दुपारी आग लागल्याची घटना घडली. दहेगाव-गोसावी स्थानकादरम्यान रेल्वेच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याने एकच खळबळ उडाली. डब्यातून निघणारे धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा पाहून प्रवाशांच्या काळजात धस्स झाले.

2/6
आगीने रौद्र रूप धारण केल्याचे पाहताच, जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी ट्रेनमधून ट्रॅकवरच उड्या टाकल्या. वर्धा-जीटी एक्सप्रेस दहेगाव गोसावी परिसरातील हे लोडीजवळ आली असता, रेल्वेच्या पार्सल व्हॅनला अचानक आग लागली.

3/6
डब्यातून मोठ्या प्रमाणावर धूर बाहेर येऊ लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली. त्यानंतर ही आग गार्डच्या डब्यापर्यंत पसरली. आगीची माहिती मिळताच ट्रेन थांबली आणि तो डबा तातडीनं वेगळा करण्यात आला.

4/6
ट्रेन थांबताच प्रवाशांनी सामानाची पर्वा न करता जीव वाचवण्यासाठी बाहेर धाव घेतली. अनेक प्रवाशांनी थेट रेल्वे ट्रॅकवरच उड्या मारल्या, यादरम्यान काही प्रवासी जखमी झाल्याचंही सांगितलं जात आहे. सुदैवान कोणतीही जीवितहानी झाली नाही.

5/6
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग केवळ पार्सल डब्याला लागली होती. वेळीच खबरदारी घेतल्याने ही आग प्रवाशांच्या डब्यापर्यंत पोहोचली नाही. ही सर्वात मोठी दिलासादायक बाब आहे. मात्र, आगीमुळे पार्सल डब्यातील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाले आहे.

6/6
घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. या भीषण आगीच्या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement