advertisement

Solapur News: घरात नको ‘त्या’ अवस्थेत दिसला मुलगा, तृतीयपंथीयाचं राक्षसी कृत्य, अशी घडवली अद्दल!

Last Updated:

Solapur News: काळजीत पडलेल्या आईने शोधाशोध सुरू केली असता, धक्कादायक दृश्य समोर आले. शेजारीच राहणाऱ्या दिनेश डफळे याच्या घरात मुलगा विचित्र अवस्थेत आढळला.

Solapur News: घरात नको ‘त्या’ अवस्थेत दिसला मुलगा, तृतीयपंथीयाचं राक्षसी कृत्य, अशी घडवली अद्दल!
Solapur News: घरात नको ‘त्या’ अवस्थेत दिसला मुलगा, तृतीयपंथीयाचं राक्षसी कृत्य, अशी घडवली अद्दल!
सोलापूर: एका 14 वर्षांच्या निष्पाप अल्पवयीन मुलावर अत्याचार करणाऱ्या नराधम तृतीयपंथीयाला जन्माची अद्दल घडली आहे. सोलापूरचे विशेष न्यायाधीश डी.एम. सुरवसे यांनी आरोपी दिनेश विठ्ठल डफळे (वय 35) याला 20 वर्षे सश्रम कारावास आणि 10 हजार रुपये दंडाची कठोर शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे समाजात वावरणाऱ्या विकृत प्रवृत्तींना मोठा चपराक बसली आहे.
सोलापुरात एप्रिल 2020 मध्ये काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली होती. पीडित मुलगा घराबाहेर शौचालयाला गेला होता, मात्र बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. काळजीत पडलेल्या आईने शोधाशोध सुरू केली असता, धक्कादायक दृश्य समोर आले. शेजारीच राहणाऱ्या दिनेश डफळे याच्या घरात मुलगा विचित्र अवस्थेत आढळला.
advertisement
आईने विश्वासात घेऊन विचारले असता, मुलाने रडत आपला छळ मांडला. आरोपीने पीडित मुलाला ओढत घरात नेले, दोन्ही दरवाजे लावून घेतले आणि माझ्यावर अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, कोणाला सांगितल्यास आई आणि भावाला जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने मुलाची वाचा बंद करण्याचा प्रयत्न केला होता.
मंद्रूप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांनी तपास करून ठोस पुरावे गोळा केले. न्यायालयात सरकारी वकील कविता बागल यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पीडित मुलगा, त्याची आई, डॉक्टर आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षी या खटल्यात मैलाचा दगड ठरल्या.
advertisement
उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर आणि मंद्रुपचे प्रभारी अधिकारी शंकर पटवारी यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी पीएसआय विजयकुमार जाधव आणि कॉन्स्टेबल पूजा काळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायाधीशांनी सर्व बाजू आणि पुरावे ग्राह्य धरून आरोपीला 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गुन्हेगाराला कायद्याचा धाक असणे आवश्यक आहे. हाच संदेश या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News: घरात नको ‘त्या’ अवस्थेत दिसला मुलगा, तृतीयपंथीयाचं राक्षसी कृत्य, अशी घडवली अद्दल!
Next Article
advertisement
बाजारात मोठी उलथापालथ, सोने 58 हजाराने कोसळणार; भारतात दर 1 लाखाच्या खाली येणार, कनेक्शनवर धक्कादायक अंदाज
बाजारात उलथापालथ, सोन्याच्या किंमती 58 हजाराने कोसळणार; दर 1 लाखाच्या खाली येणार
  • सोनं खरेदीपूर्वी थांबा

  • भारतात दर १ लाखाच्या खाली येणार

  • तज्ज्ञांची मोठी भविष्यवाणी

View All
advertisement