ठाणे-सीएसएमटी प्रवाशांसाठी महापालिकेची मोठी भेट
शीव उड्डाणपूल परिसरातही अशीच परिस्थिती आहे. सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळेत येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे शीव उड्डाणपुलाला समांतर नवीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा पूल उभारण्यात आल्यास ठाण्याहून सीएसएमटी परिसरात जाणाऱ्या वाहनांना थेट आणि सोपा मार्ग उपलब्ध होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडीही बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
advertisement
शीवमध्ये नवा उड्डाणपूल येतोय
सध्या शीव उड्डाणपुलावर एकूण तीन मार्गिका आहेत. त्यापैकी दोन मार्गिका ठाणे आणि पूर्व उपनगरांच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी आहेत तर एक मार्गिका दक्षिण मुंबईतील सीएसएमटीकडे जाणाऱ्या वाहनांसाठी वापरली जाते. मात्र वाढत्या वाहनसंख्येमुळे हा पूल अपुरा पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे समांतर पूल उभारण्याचा पर्याय पुढे आला आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कामासाठी वाहतूक पोलिसांकडून परवानगी घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याआधी महालक्ष्मी परिसरातील उड्डाणपुलाचा विस्तार रद्द झाल्याने तोच कंत्राटदार आता शीव उड्डाणपुलाच्या समांतर नवीन पूल बांधणार आहे.
या नवीन उड्डाणपुलावर ठाण्याच्या दिशेने एक मार्गिका आणि ठाणे ते सीएसएमटी दिशेने जाण्यासाठी दोन मार्गिका असतील. त्यामुळे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि इंधन बचतीचा होणार आहे.
