TRENDING:

पायाला धरलं, फिरवून जमीनीवर आदळलं, 4 वर्षाच्या मुलाला विकृताची अमानुष मारहाण, वसईतील घटना!

Last Updated:

मुंबई उपनगरच्या वसई पश्चिम परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं एका नराधमाने किरकोळ वादाचा राग एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर काढला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
संकेत वरक, प्रतिनिधी मुंबई: मुंबई उपनगरच्या वसई पश्चिम परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. इथं एका नराधमाने किरकोळ वादाचा राग एका ४ वर्षांच्या निष्पाप चिमुकल्यावर काढला आहे. त्याने चिमुकल्याला अमानुषपणे मारहाण केली. या जीवघेण्या हल्ल्यात बालक गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर सध्या मिरा रोड येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण वसई-विरार परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
vasai news
vasai news
advertisement

नेमका प्रकार काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप पवार याचे चिमुकल्याच्या वडिलांशी काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झालं होतं. या वादाचा राग संदीपच्या मनात धुमसत होता. हाच सूड उगवण्यासाठी त्याने संधी साधून सोसायटीच्या आवारात खेळत असलेल्या ४ वर्षांच्या मुलाला लक्ष्य केलं. या अमानुष मारहाणीचा व्हिडीओ सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हायरल व्हिडीओतील दृश्य विचलीत करणारी आहेत. त्यामुळे न्यूज १८ मराठी संबंधित व्हिडीओ प्रकाशित करत नाही.

advertisement

यात आरोपी संदीप पवार हा निष्पाप मुलाचे पाय पकडून त्याला फिरवून जमीनीवर आपटताना दिसत आहे. तो इतक्यावरच थांबला नाही, त्याने मुलाला बाजुला उभ्या असलेल्या वाहनावर देखील आपटलं आहे. या अमानुष मारहाणीमुळे मुलाला गंभीर दुखापत झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता.

घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा

advertisement

मुलाची प्रकृती चिंताजनक

घटनेनंतर जखमी मुलाला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्याला मिरा रोड येथील मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. सध्या हा चिमुकला ICU मध्ये मृत्यूशी झुंज देत असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे.

आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी, कांदा दर पडलेलेच, लिंबाला काय मिळतोय भाव?
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तातडीने तपास चक्रं फिरवून आरोपी संदीप पवार याला अटक केली आहे. मुलाच्या वडिलांशी वाद असताना एका बालकावर असा निर्दयी हल्ला केल्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. घटनेचा अधिक तपास केला जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
पायाला धरलं, फिरवून जमीनीवर आदळलं, 4 वर्षाच्या मुलाला विकृताची अमानुष मारहाण, वसईतील घटना!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल