TRENDING:

लग्नानंतर अवघ्या 4 वर्षांत संसाराची राखरांगोळी; गावाहून परतलेल्या आई-वडिलांच्या किंकाळीने पनवेल हादरले

Last Updated:

Navi Panvel News : पनवेल शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. जिथे गावावरुन परतल्यानंतर घरातले दृश्य पाहून एक वयोरुद्ध जोडप हादरलं आहे. नेमंक काय घडलं असेल ते सविस्त जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पनवेल : मुंबई असोवा अन्य शहरातून तरुण वयात आत्महत्या करण्याच्या घटना वारंवार समोर येत असतात. त्यातच नवीन पनवेलमधील सेक्टर सात परिसरात एका 35 वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सौरभ राजू मिश्रा असे मृत तरुणाचे नाव असून तो एका खासगी कंपनीत नोकरी करत होता.
Navi Mumbai News
Navi Mumbai News
advertisement

आई-वडील घरी येताच हृदयद्रावक प्रकार उघड

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 2) सकाळी सौरभचे आई-वडील गावी गेलेले होते. याच वेळेत सौरभने घरात विष प्राशन केले. सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास आई-वडील घरी परतले असता सौरभ बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. त्यांनी तातडीने त्याला पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

advertisement

संसाराला वादाचं ग्रहण

सौरभचे लग्न 2022 मध्ये झाले होते. मात्र लग्नानंतर काही महिन्यांतच त्याच्या आणि त्याच्या बायकोमध्ये मतभेद निर्माण झाले. हे मतभेद हळूहळू वाढत गेले आणि प्रकरण थेट न्यायालयात पोहोचले. सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे सौरभ मानसिक तणावाखाली असल्याची माहिती समोर आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
हळदीला उच्चांकी भाव, डाळिंब आणि आल्याला काय मिळाला दर? इथं चेक करा
सर्व पहा

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. आत्महत्येमागील नेमके कारण कौटुंबिक वाद आहे का की अन्य काही गोष्ट आहे याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

advertisement

मराठी बातम्या/मुंबई/
लग्नानंतर अवघ्या 4 वर्षांत संसाराची राखरांगोळी; गावाहून परतलेल्या आई-वडिलांच्या किंकाळीने पनवेल हादरले
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल