सिंधुदुर्ग - कोकणात रोजगार नसल्याने कोकणातील तरुण नोकरीसाठी मुबंई किंवा इतर शहरात जातो. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका तरुणाने मुबंईतील बँकेतील नोकरी सोडून गावी वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून हा तरुण आज दिवसाकाठी 7-8 हजार नफा कमवत आहे. आज जाणून घेऊयात, या तरुणाची प्रेरणादायी कहाणी.
अक्षय तरंगे असे या तरुणाचे नाव आहे. तो सिंधुदुर्गच्या कणकवली येथील रहिवासी आहे. 30 वर्षीय अक्षय आज मुबंईतील बँकेतील नोकरी सोडून गावी येऊन एमबी वडापाव या नावाने वडापाव विक्रीचा व्यवसाय करत आहे.
advertisement
लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेल्या अक्षयवर कुटुंबाची जबाबदारी असल्याने तो मुबंईत नोकरी करत होता. मात्र, भाड्याच्या खोलीत व मुबंईत राहण्याची व्यवस्था नसल्याने तो कुटुंबासमवेत आपल्या गावातच काही तरी व्यवसाय करण्याचे त्याच्या मनात आले. त्यामुळे तो मुबंईतील नोकरी सोडून गावी आला.
गावी आल्यानंतर त्याच्या मामाच्या संकल्पनेने वडापावच्या गाडीचा व्यवसाय करावा, अशी संकल्पना डोक्यात आली. त्यानुसार मामा व भाचे दोघांनी मिळून MB वडापावच्या नावाने वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू केला. यामध्ये वडापाव हा वेगळा असावा या हेतूने त्यांनी तंदुर वडापाव आणि शेजवान वडापाव विक्रीस सुरुवात केली.
आता या वडापावला ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर पसंती मिळू लागली. अक्षय आज आपल्या गावातच राहून मुंबईतील नोकरीपेक्षा आर्थिक नफा कमवत आहे. अक्षय दिवसाकाठी या व्यवसायातून 7 ते 8 हजार रुपये नफा कमवत आहे. त्याने जिद्दीने घेतलेला निर्णय आज यशस्वी करुन दाखवला आहे. त्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.