कॅन्सरसाठी लाखो रुपयांच्या उपचाराची भीती, आता चिंता नको, महाराष्ट्रात याठिकाणी मिळतात मोफत उपचार, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
cancer free treatment - छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग वैद्यकीय महाविद्यालय गेल्या 12 वर्षांपासून अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याचे काम अगदी मोफत करत आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालते, आत्तापर्यंत किती रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार देण्यात आले आहेत, या ठिकाणी कोणकोणत्या आजारावर मोफत उपचार केले जातात याविषयी विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी महत्त्वाच माहिती दिली.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : कॅन्सर या आजाराबाबत अनेकांच्या भीती निर्माण होते. त्यात कॅन्सरसारख्या आजारावर उपाचारासाठी लाखो रुपये खर्च करावा लागतो. तसेच इतके पैसे खर्च करुनही तो बरा होईल की नाही, हे सांगणे कठीणच आहे, असं म्हटलं जातं. पण एक ठिकाणी असं आहे ज्याठिकाणी मागील अनेक वर्षांपासून कॅन्सरसारख्या आजारावर मोफत उपचार केले जातात. याचबाबत लोकल18 चा हा स्पेशल रिपोर्ट.
advertisement
छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग वैद्यकीय महाविद्यालय गेल्या 12 वर्षांपासून अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार करण्याचे काम अगदी मोफत करत आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने काम चालते, आत्तापर्यंत किती रुग्णांना याठिकाणी मोफत उपचार देण्यात आले आहेत, या ठिकाणी कोणकोणत्या आजारावर मोफत उपचार केले जातात याविषयी विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी महत्त्वाच माहिती दिली.
advertisement
मुंबईतील ही 7 ठिकाणं कोणती, जिथं मिळतात सर्वात भारी वडापाव, photos
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय कर्करोग वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे गेल्या 12 वर्षांपासून अनेक रुग्णांवर यशस्वीपणे उपचार करुन त्यांना बरे करत आहेत. कॅन्सरसारखा आजार झाला तरी तो बरा होण्यासाठी आपल्याला लाखो रुपये खर्च करावे लागतात. पण या रुग्णालयामध्ये या आजारावर मोफत उपचार केले जातात. तसेच कॅन्सरही बरा होतो. अत्याधुनिक सर्व सेवा या ठिकाणी रुग्णांना देण्यात येतात. या रुग्णालयामध्ये मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि देशातूनही अनेक रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.
advertisement
मराठवाड्यामधील हे पहिले शासकीय कर्करोग रुग्णालय आहे. यामुळे याचा मराठवाड्यातील रुग्णांना खूप मोठा फायदा झाला आहे. पूर्वी जर कॅन्सर हा आजार झाला तर त्यावर उपचार घेण्यासाठी रुग्णांना मुंबई, पुण्याला जावे लागायचे. पण आता या रुग्णालयामुळे मराठवाड्यातच चांगला आणि मोफत उपचार होतो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना याचा जास्त प्रमाणात फायदा होतो आहे.
advertisement
शासकीय कर्करोग रुग्णालयामध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या केमोथेरपीस उपलब्ध आहेत. त्यासोबतच या ठिकाणी विशेष करून लहान मुलांना होणाऱ्या कॅन्सरवरील उपचार सर्व डॉक्टर अगदी मन लावून प्रयत्न करतात. रुग्णांनी कॅन्सर सारखा आजार झाल्यानंतर घाबरून जाऊ नये. त्यावर योग्य ते उपचार करावा आणि जर तुम्ही योग्य उपचार केले तर तुमचा आजार नक्कीच हा बरा होतो, अशी माहितीही त्यांनी दिली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
September 23, 2024 4:21 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कॅन्सरसाठी लाखो रुपयांच्या उपचाराची भीती, आता चिंता नको, महाराष्ट्रात याठिकाणी मिळतात मोफत उपचार, VIDEO