तुम्हाला ऐकायचं नसेल तर...
मराठ्यांनी शांत रहावं. माझी कळकळीची विनंती आहे की, सर्वांनी शांततेनं आणि संयमाने घ्यावं. सर्वांना माझी शेवटची विनंती आहे की, सर्वांनी शांत रहावं. तुम्हाला ऐकायचं नसेल तर तुम्ही आमचे कार्यकर्ते आहे की नाही, हे म्हणावं लागेल. सीएसएमटी परिसरातील आंदोलकांनी शांततेत रहावं. पत्रकार बांधवांना सांगतोय की, पत्र पोरं हुल्लाडबाजी करत नाहीत, सरकार हुल्लडबाजी करतंय. सरकारला आम्ही वेळ दिला होता. मराठ्यांना हिणवलं जातंय. हुल्लडबाज देवेंद्र फडणवीस आहे, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.
advertisement
माझ्या पोटात आग होतीये, शांत रहा
मुख्यमंत्र्यांनी बालबुद्धि असल्यासारखं बोलतात. मुद्दाम मराठ्यांचे प्रश्न सोडवत नाही. मला त्रास होतोय. पोटात आग होतीये. शरिरातील पाणी बाहेर येयला लागलंय. माझे ओठ चिटकायला लागले आहेत. मला बोलता येत नाहीये. त्यामुळे मराठा आंदोलकांना विनंती आहे, गप बसा. मला बोलायला लावू नका. सरकारच्या हातातून अजून वेळ गेली नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
पाच कोटी मराठे मुंबईत येतील
दरम्यान, महाराष्ट्र मुंबईकडे येयचे बाकी आहेत. त्यावेळी मुंबईत कुठंच उभं रहायला जागा मिळणार नाही. गाड्या लावायचं सोडा उभं पण राहता येणार नाही. पाच कोटी मराठे मुंबईत येतील, असं म्हणत जरांगे यांनी सरकारवर इशारा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी सुविधा दिल्या नाहीत म्हणून पोरं चिडले. आंदोलकांच्या भावना समजून घ्या, असंही मनोज जरांगे म्हणाले आहेत.