पतीपासून वेगळं केल्यास लग्नाचं आश्वासन
या प्रकरणातील आरोपीचे नाव किरण पावशे (वय 35) असून तो तळोजा भागात राहणारा आहे. पीडित महिला देखील तळोजा परिसरात वास्तव्यास आहे. आरोपीचे तळोजामध्ये मोटार ट्रेनिंग स्कूल असून जुलै 2022 मध्ये पीडित महिला ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तेथे गेली होती.
प्रशिक्षणाच्या काळात आरोपीने तिच्याशी जवळीक साधली आणि तिच्या पतीने तिला सोडून दिल्यास आपण तिच्याशी लग्न करू तसेच तिचा आणि तिच्या मुलाचा सांभाळ करू असे खोटे आश्वासन दिले. या आमिषाखाली आरोपीने मोटार ट्रेनिंग स्कूलच्या ठिकाणी तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. हा प्रकार सुमारे तीन वर्षे सुरू होता.
advertisement
विरोध करताच आरोपीचा हैवानपणा वाढला
पीडितेने या अत्याचाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिच्या मुलाला मारण्याची धमकी दिली तसेच अश्लील शिवीगाळ केली. अखेर मानसिक त्रासाला कंटाळून पीडित महिलेने 4 फेब्रुवारी रोजी तळोजा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला असून, त्याला अद्याप अटक झालेली नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
