मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण
मुंबईसारख्या महागड्या शहरात स्वतःचे हक्काचे घर घेणे सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठे स्वप्न असते. प्रत्येक इंच जागेला मोठा भाव असलेल्या मुंबईत म्हाडा परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देतो. त्यामुळे म्हाडाच्या लॉटरीला नेहमीच मोठी मागणी असते. याच कालावधीत म्हाडाच्या कोकण मंडळाकडूनही सुमारे चार हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे.
advertisement
अनेक म्हाडा प्रकल्प तयारीच्या टप्प्यात
गेल्या 76 वर्षांत म्हाडाने राज्यभरात सर्वसामान्य नागरिकांना सुमारे नऊ लाख परवडणारी घरे उपलब्ध करून दिली आहेत. सध्या बी.डी.डी. चाळ, मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प, जी.टी.बी. नगर येथील पंजाबी कॉलनी, पत्राचाळ, अभ्युदय नगर, पूनम नगर तसेच अंधेरीतील सरदार वल्लभभाई पटेल नगर यांसारखे अनेक प्रकल्प नियोजनाच्या टप्प्यात आहेत.
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांना सर्वाधिक मागणी असते. त्याचबरोबर कोकण मंडळाच्या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र, कोकण मंडळाच्या काही प्रकल्पांच्या परिसरात अद्याप रस्ते, पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधा पूर्णपणे विकसित झालेल्या नाहीत. त्यामुळे लॉटरीनंतर काही वेळा नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जाते.
ही बाब लक्षात घेऊन म्हाडा प्राधिकरणाने पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य दिले असून घरांच्या किमतीही कमी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे येत्या लॉटरीत कोकण मंडळाच्या घरांनाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
