शहापूरच्या या रिसॉर्टमध्ये लपला होता मिहीर: मिहीर शाह वरळीतील अपघातानंतर फरार झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत त्याला शहापूरच्या माशाअल्ला रिसॉर्टमधून अटक केली आहे. त्याच्यासोबत या रिसॉर्टमध्ये आणखी 12 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. अटक केलेल्या या 12 जणांमध्ये मिहीर शाहची आई आणि बहिणीचा देखील समावेश आहे. या सर्वांनी मिहीर शाहला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
advertisement
नेमकं काय घडलं? 7 जुलैच्या पहाटे नाखवा दाम्पत्य मच्छी खरेदी विक्रीच्या व्यवहारानिमित्त बाहेर पडलं. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर आणि त्याचे काही साथीदार लेट नाईट पार्टीवरून मद्यधुंद अवस्थेत परतत असताना या दाम्पत्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महिलेच्या अंगावर धडकेनंतर जाणूनबुजून गाडी चालवण्यात आली. आता या प्रकरणात अटकेची प्रक्रिया सुरू आहे. मुख्य आरोपीसह इतर 12 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी मिहीर शाहला शहापूरमधून नुकतीच अटक करण्यात आली. या प्रकरणानंतर राज्यातील गृहखातं, पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कार्यक्षमतेवर विरोधकांकडून तसेच जनतेतून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. आता ही तपास प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नाखवा दाम्पत्याला न्याय कसा मिळतो, हे स्पष्ट होईल.
"हिट अँड रन नव्हे, हा तर मर्डर" वरळी दुर्घटनेवर आदित्य ठाकरे बोलले...
आदित्य ठाकरे आक्रमक: नेमकं कोण कुणाला साथ देतं आहे, कोण कुणाला पाठिशी घालतं आहे?” असे सवाल उपस्थित करत आदित्य ठाकरेंनी गृहविभाग पर्यायाने देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवले आहे. तसेच अश्या प्रकरणात ब्लड सँपलची फेरफार हा एक चिंतेचा विषय मानला जातो, पुणे हिट अँड रन प्रकरणात त्याची आपण सर्वांना प्रचिती आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला मर्डरची केस म्हणूनट्रीट करा अशी आग्रही मागणी आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यानंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप आणि प्रत्यारोप देखील सुरू झाले.
