TRENDING:

काळ आला होता पण वेळ नाही! 25 फुटांवरुन स्लॅब रिक्षावर आदळला, मुलुंडमधील काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO

Last Updated:

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! २५ फुटांवरून 'तो' स्लॅब रिक्षावर आदळला; मुलुंडमधील काळजाचा ठोका चुकवणारा Video समोर

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबईत मेट्रोचे काम सुरू असताना आज दुपारी काळजाचा ठोका चुकवणारी एक भीषण दुर्घटना घडली. मुलुंड पश्चिम भागात मेट्रोच्या कामाचा एक अवजड भाग पिलर आणि स्लॅबचा भाग तब्बल २५ फुटांच्या उंचीवरून थेट रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांवर कोसळला. या दुर्घटनेत एका रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मात्र, सुदैवाने रिक्षातील चालक थोडक्यात बचावला. अगदी म्हणजे अगदी काही सेकंदासाठी तो वाचला.
News18
News18
advertisement

नेमकं काय घडलं?

मुलुंडमध्ये मेट्रो लाईन ४ चे काम वेगाने सुरू आहे. नेहमीप्रमाणे रस्त्यावर वाहनांची वर्दळ असताना, अचानक २५ फुटांच्या उंचीवर असलेला मेट्रोच्या खांबाचा काही भाग आणि लोखंडी सळ्याचा एक भाग थेट खाली कोसळला. हा भाग इतका अवजड होता की, खाली उभ्या असलेल्या दोन ते तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. यात एका रिक्षावर हा स्लॅब थेट आदळल्याने रिक्षाचा वरचा भाग पूर्णपणे चेपला गेला.

advertisement

३ ते ४ जण जखमी, परिसरात खळबळ

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या भीषण अपघातात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली असून काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. या दुर्घटनेचा एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, रिक्षा चालकाचा पाय हा स्लॅबखाली दबाला गेला आहे. त्यामुळे त्याला बाहेर पडता येत नाही. काही सेकंदांच्या फरकाने त्याचा जीव वाचला.

advertisement

advertisement

प्रशासनाच्या हलगर्जीपणावर संताप

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
वय 75 अन् 50 वर्षांची साथ, पुणेरी आजी-आजोबाची जोडी जोरात, पाहा भन्नाट Love Story
सर्व पहा

मुलुंडमधील या घटनेमुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. यापूर्वीही मुंबईत मेट्रोच्या कामादरम्यान अशा घटना घडल्या आहेत, पण आजच्या घटनेने प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. तर दुसरीकडे मेट्रोच्या बांधकामात हलगर्जीपणा होतोय का असाही प्रश्ना काही नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
काळ आला होता पण वेळ नाही! 25 फुटांवरुन स्लॅब रिक्षावर आदळला, मुलुंडमधील काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल