आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता महापौर आणि उपमहापौर निवडीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवड 30 किंवा 31 जानेवारी रोजी होणार आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय महापालिकेचे नगरसचिव घेणार असून, त्यानुसार निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. मुंबईप्रमाणेच उर्वरित 28 महानगरपालिकांमध्येही याच दिवशी महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार आहे. मात्र, त्या-त्या महापालिकांमध्ये निवडणुकीची तारीख आणि वेळ निश्चित करण्याचे अधिकार संबंधित विभागीय आयुक्तांकडे असणार आहेत.
advertisement
कशी असणार निवड प्रक्रिया?
निवड प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणून सर्व 29 महानगरपालिकांमधील इच्छुक नगरसेवक 27 आणि 28 जानेवारी दरम्यान आपले उमेदवारी अर्ज महापालिका सचिवांकडे सादर करणार आहेत. अर्ज छाननीनंतर 30 किंवा 31 जानेवारी रोजी महापौर आणि उपमहापौर पदासाठी प्रत्यक्ष निवडणूक होईल. ही निवड प्रक्रिया नव निर्वाचित नगरसेवकांच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पार पडणार आहे.
कसा असणार महापौर निवडीचा कार्यक्रम?
- 23 जानेवारी: नगरसचिवांनी महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक घेण्याकरिता निर्वाचित सदस्यांची बैठक बोलवण्यासाठी तारीख आणि वेळ निश्चितीसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे प्रस्ताव सादर करणार
- 24, 25 जानेवारी: विभागीय आयुक्त यांनी महापालिकेच्या प्रथम सभेची तारीख आणि पीठासन अधिकारी निश्चित करणार
- 27, 28 जानेवारी: महापौर, उपमहापौर पदासाठी इच्छुक सदस्य नामनिर्देश पत्र महापालिका सचिवांना केलं जाणार सदर
- 30, 31 जानेवारी: महापौर व उपमहापौर पदासाठी नवनिर्वाचित सदस्यांची बैठक घेऊन महापौर व उपमहापौर निवडण्यात येणार
दरम्यान, महापौर पदासाठी महिलांसाठी आरक्षण जाहीर झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला असून, विविध पक्षांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे, नागपूर आणि नाशिकमध्ये महापौरपदासाठी कोणत्या महिला नेत्याची निवड होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
