तुम्ही कधी पाहिले नसतील असे 200 अडकित्ते, प्राध्यापक सरांकडे अनोखा संग्रह
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Mohan Najan
Last Updated:
या प्राध्यापकाने आतापर्यंत तब्बल 200 पेक्षा जास्त आडकित्याचा संग्रह केला आहे. या संग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आडकित्ते त्यांच्याकडे आहेत.
छत्रपती संभाजीनगर : प्रत्येक माणसाला काही ना काही छंद असतोच, जो त्याला जगण्यामधील आनंद देत असतो. असाच एक छंद छत्रपती संभाजीनगरमधील सेवानिवृत्त प्राध्यापकाला आहे. या प्राध्यापकाने आतापर्यंत तब्बल 200 पेक्षा जास्त आडकित्याचा संग्रह केला आहे. या संग्रहामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आडकित्ते त्यांच्याकडे आहेत.
कशी झाली सुरुवात?
छत्रपती संभाजीनगरमधील या प्राध्यापकाचे नाव डॉ. अनिल मुंगीकर आहे. माझ्या घरी लहानपणापासूनच माझे आजोबा, आई-वडील पान खात होते. त्यामुळे पान सुपारीचा डबा आमच्या घरी होता. त्या डब्यामध्ये आडकित्ता होता. तेव्हा मला आडकित्ता वापरायची संधी मिळाली. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर मला वाटले की आपण वेगवेगळ्या प्रकारचे आडकित्ते गोळा केले पाहिजेत. त्यामुळे मी शहागंज भागामध्ये असलेल्या म्युझियममध्ये गेलो. आडकित्ते गोळा करावेत असं मला वाटलं म्हणून मी गोळा करायला सुरुवात केली. गेल्या 16 वर्षांपासून मी आडकित्ते गोळा करत आहे, असं डॉ. अनिल मुंगीकर सांगतात.
advertisement
कोणत्या प्रकारचे आडकित्ते प्रकार
चांदीचे आडकित्ते, मोराच्या आकाराचे आडकित्ते, बारीक नक्षीकाम असलेले आडकित्ते, माशाच्या आकाराचे आडकित्ते, घोड्याच्या आकाराचे आडकित्ते, पालखी आडकित्ता, प्राण्यांच्या आकाराचे आडकित्ते, मेल आणि फिमेल आकाराचे आडकित्ते, घुंगराचे आडकित्ते, मुघलाईन आडकित्ते या प्रकारचे आडकित्ते अनिल मुंगीकर यांच्याकडे आहेत. यामध्ये सर्वात महाग आडकित्ता चांदीचा आहे. त्याची किंमत साधारणतः आठ ते नऊ हजाराच्या घरामध्ये आहे.
advertisement
कुठून आडकित्ते गोळा केले आहेत
हे आडकित्ते गोळा करण्यासाठी जुन्या बाजारात जातो तसेच भाडे असणाऱ्या दुकानदारांना सांगून ठेवले आहे की भंगारामध्ये आडकित्ते आले की सांगा. त्याचबरोबर मी ऑनलाईन आडकित्ते मागवलेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मद्रास, राजस्थान, जामनेर इथून मागवले आहेत. जर मी कुठे बाहेरगावी गेलो तर तिथल्या दुकानांमध्ये आडकित्ते खरेदी करतो. आता माझ्याकडे 225 पेक्षा जास्त आडकित्ते आहेत, असं अनिल मुंगीकर सांगतात.
Location :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 23, 2026 4:03 PM IST
मराठी बातम्या/छ. संभाजीनगर/
तुम्ही कधी पाहिले नसतील असे 200 अडकित्ते, प्राध्यापक सरांकडे अनोखा संग्रह







