Beed : 'जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो' म्हणत तरुणावर सपासप वार, पोलिसांनी 2 तासात खेळ संपवला!
- Published by:Saurabh Talekar
Last Updated:
Beed Kej Crime Young Boy finished : 'जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो' म्हणत पाच जणांनी मिळून तरुणाच्या डोक्यावर कत्तीने वार केल्याची धक्कादायक घटना केजमध्ये घडली आहे.
Jayram chate Gets Temporary Bail : गुरूवारी सकाळी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे 14 महिन्यांनंतर बीड जिल्हा कारागृहाबाहेर आला. जयराम चाटेच्या बाराव्या विधीस उपस्थित राहण्यासाठी त्याची सुटका करण्यात आली. अशातच संतोष देशमुखांच्या कुटूंबियांनी यावर आक्षेप नोंदवला होता. अशातच आता 'जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो' म्हणत पाच जणांनी मिळून तरुणाच्या डोक्यावर कत्तीने वार केल्याची धक्कादायक घटना केजमध्ये घडली आहे.
आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 1313 तुला दाखवतो
तरुणाच्या रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना केजमधील तांबवा येथे घडली. जयराम चाटे गावी येण्यापूर्वी एक दिवस आधी हा हल्ला झाला. तांबवा येथील नरसिंग उर्फ संग्राम अभिमान चाटे हा तरुण मित्र आदित्य बडे याच्यासह दुचाकीवरून शेतात जात होता. संशयितांनी दोघांचा दुचाकीवरून पाठलाग केला. तसेच दया चाटे आणि शरद चाटे, अमोल ठोंबरे, सागर चाटे, गोट्या भालेकर या पाच जणांनी तरुणाला अडवलं. संशयितांनी नरसिंग चाटे याची दुचाकी अडवत मारहाण सुरू केली केली. आमचा किंग पॅटर्न कृष्णा आंधळे 1313 तुला दाखवतो. तुला आज जिवंत ठेवत नाही, असे म्हणत त्याच्यावर वार केले. या घटनेनंतर 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
advertisement
पोलिसांनी मस्साजोगचा रस्ता टाळला
सरपंच देशमुख हत्याकांडातील आरोपी जयराम चाटे याला मृत भावाच्या धार्मिक विधीसाठी शुक्रवारी बंदोबस्तात त्याच्या गावी तांबवा येथे आणले होते. जयराम चाटेचे तांबवा हे गाव मस्साजोग गावाजवळच आहे. यामुळे जयरामला गावी नेताना पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने मस्साजोगहून तांबव्याला जाणारा मार्ग टाळला. त्याला धारुरमार्गे दुसऱ्या रस्त्याने पोलिस घेऊन गेले व त्याच रस्त्याने येताना परत आणले. पोलिसांनी फक्त दोन तासातच त्याला तुरूंगात पुन्हा आणलं.
advertisement
जयरामला दोनच तास थांबू दिलं
दरम्यान, जयराम चाटेला विधीसाठी सात तासांची परवानगी देण्यात आली होती. पण पोलिसांनी त्याला दोनच तास तिथं थांबू दिलं. त्यानंतर त्याला पुन्हा कारागृहाचा रस्ता दाखवला. चाटेला बंदोबस्तात कारागृहातून शुक्रवारी सकाळी 11:45 वाजेच्या सुमारास गावात आणलं तर दुपारी 1:22 वाजता परत नेलं. काही अधिकारी यावेळी साध्या वेळात घटनास्थळी उपस्थित होते.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 9:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed : 'जयराम चाटे येतोय, तुला कृष्णा आंधळे दाखवतो' म्हणत तरुणावर सपासप वार, पोलिसांनी 2 तासात खेळ संपवला!








