छेड काढल्याचा सैयबला संशय
साबीर हयातउल्ला शेख हा गोवंडी येथे राहात असून त्याचा सैयब हा परिचित आहे. तो देखील याच परिसरात राहतो. सैयबच्या बहिणीची साबीरचा भाचा नवाज याने छेड काढल्याचा सैयबला संशय होता. त्यामुळे त्याच्या मनात नवाजविरुद्ध प्रचंड राग होता. शनिवारी रात्री नऊ वाजता नवाज गोवंडीतील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, डॉ. झाकीर हुसैन नगर, बबलू किराणा दुकानाजवळ उभा होता.
advertisement
लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण
यावेळी तिथे सैयब आला आणि त्याने त्याला बहिणीची छेड का काढली याचा जाब विचारून बेदम मारहाण केली. त्याचे डोके जमिनीवर आपटून चेहऱ्यावर लाथ्याबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यात नवाजचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह नंतर राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी थेट कारवाई करण्यास सुरूवात केली.
आरोपीला अटक
दरम्यान, या प्रकरणी साबीर शेख याची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून हा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर सैयबविरुद्ध पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांनी शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना त्याला गोवंडी येथून पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.
