TRENDING:

Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 60 तास उलटूनही बचावकार्य सुरूच

Last Updated:

यातील एक मृतदेह महिलेचा तर एक पुरुषाचा असल्याचं समोर आलं आहे. होर्डिंगच्या खाली अडकलेल्या कारमधून हे मृतदेह काढण्यात आले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मुंबईत सोमवारी झालेल्या अवकाळी पावसानं दाणादाण उडवली, त्याच वेळी घाटकोपरमध्ये भलमोठं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला असल्याचं बुधवारी रात्रीपर्यंत समोर आलं होतं. मात्र, हा आकडा आता आणखी वाढला आहे. घटनास्थळी आणखी दोन मृतदेह सापडल्याने मृतांचा आकडा आता 17 वर पोहोचला आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
advertisement

यातील एक मृतदेह महिलेचा तर एक पुरुषाचा असल्याचं समोर आलं आहे. होर्डिंगच्या खाली अडकलेल्या कारमधून हे मृतदेह काढण्यात आले आहेत. होर्डिंगच्या खाली धडकलेल्या कारमधून दोन मृतदेह (1 पुरुष आणि महिला) काढण्यात आले आहेत. होर्डिंग दुर्घटनास्थळी अजूनही मोठ्या प्रमाणात लोखंडी ढिगारा आहे. लोखंडी ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातातील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. बचावकार्य अजूनही सुरूच आहे

advertisement

घाटकोपर होर्डिंग प्रकरणी नवा VIDEO समोर, काळजात धडकी भरवणारे ते 3 सेकंद

नियमांना कचऱ्याची टोपली दाखवून हे होर्डिंग अनधिकृतपणे त्या ठिकाणी लावण्यात आलं होतं. इतकंच नाही तर होर्डिंगसंदर्भात नोटीसही बजावण्यात आली होती. या सगळ्याला केराची टोपली दाखवून होर्डिंग तसंच ठेवण्यात आलं होतं. सोमवारी अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सांधेदुखी होईल कमी, जेवणात समावेश करा कडीपत्ता आणि तिळाची चटणी, रेसिपीचा Video
सर्व पहा

सोमवारी संध्याकाळी मुंबईतील घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपाशेजारी असलेलं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. 120 बाय 120 फूट आकाराचं होर्डिंग कोसळल्याने जवळपास 100 लोक अडकले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलं आहे. आकडा आणखी वाढण्याची भीती आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Ghatkopar Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; 60 तास उलटूनही बचावकार्य सुरूच
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल