TRENDING:

Society Maintenance: सोसायटीत द्यावा लागेल जास्तीचा मेंटेनन्स, हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब

Last Updated:

सध्या मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक इमारतींचे कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत. या कॉम्प्लेक्समधील सर्वच फ्लॅट समान नसतात. त्यातील खोल्यांची संख्या वेगवेगळी असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: घर लहान असो किंवा मोठे प्रत्येक सोसायटीतील रहिवाशांना ठराविक मेंटेनन्स भरावा लागतो. सोसायटीतील स्विमिंग पूल, क्लब हाऊस, हाऊस किपिंगसह इतर सार्वजनिक सुविधांसाठी हा मेंटेनन्स घेतला जातो. या मेंटेनन्सबाबत मुंबई हायकोर्टाने एक महत्त्वचा निर्णय दिला आहे. पुणे येथील सोसायटीतील नागरिकांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना हायकोर्टाने स्पष्ट केलं आहे की, फ्लॅटच्या आकारानुसार मेंटेनन्स देणे बंधनकारक आहे.
सोसायटीत द्यावा लागेल जास्तीचा मेंटेनन्स, हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब
सोसायटीत द्यावा लागेल जास्तीचा मेंटेनन्स, हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब
advertisement

काय आहे प्रकरण

पुणे येथील अकरा इमारती असलेल्या कॉम्प्लेक्समधील मेंटेनन्सचा मुद्दा कोर्टात उपस्थित झाला होता. या इमारतींमध्ये एकूण 356 फ्लॅट आहेत. यामध्ये 2 बीएचके, 3बीएचके आणि 4 बीएचके फ्लॅटचा आहे. या सर्व फ्लॅटधारकांसाठी सार्वजनिक सुविधांचा मेंटेनन्स समान ठेवण्यात आला होता. या निर्णयाला कमी खोल्यांचा फ्लॅट असलेल्या सदस्यांनी उपनिबंधकांसमोर आव्हान दिले होते. त्याची देखल घेऊन, घराच्या आकारानुसार मेंटेनन्स घेण्याचे आदेश उपनिबंधकांनी दिले होते. उपनिबंधकांच्या या निर्णया विरोधात जास्त खोल्या असलेल्या फ्लॅटधारकांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.

advertisement

Dombivali:210 इमारती, 10,700 फ्लॅटधारक, डोंबिवलीतील प्रसिद्ध सोसायटी निवडणुकीत मोठा गोंधळ!

हाय कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांनी उपनिबंधकांच्या आदेशावर शिक्कामोर्तब केलं आहे. फ्लॅटच्या आकाराप्रमाणे इमारतीतील सभासदांना सार्वजनिक सुविधांचा मेंटेनन्स द्यावा लागेल. मोठ्या फ्लॅटधारकांना जास्तच मेंटेनन्स द्यावा लागेल, असेही कोर्टाने स्पष्ट केलं.

सार्वजनिक सुविधांचा मेंटेनन्स सर्वांना समान ठेवण्याचा ठराव सोसायटीने केला होता, असा युक्तीवाद याचिकाकर्त्यांनी केला होता. मात्र, हा ठराव नियमानुसार झाला नसल्यास त्यात बदल करता येऊ शकतो. अशा ठरावाची अंमलबजावणी करण्याची सक्ती होऊ शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं आहे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पशुवैद्यकीय डॉक्टर झाला पशुपालक, 65 पाळल्या गायी, महिन्याला 3 लाख कमाई
सर्व पहा

सध्या मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये अनेक इमारतींचे कॉम्प्लेक्स उभे राहत आहेत. या कॉम्प्लेक्समधील सर्वच फ्लॅट समान नसतात. त्यातील खोल्यांची संख्या वेगवेगळी असते. त्यामुळे अनेकदा मेंटेनन्सचा प्रश्न उभा राहतो. या पार्श्वभूमीवर मुंबई हाय कोर्टाने दिलेला निकाल महत्त्वाचा ठरणार आहे.

मराठी बातम्या/मुंबई/
Society Maintenance: सोसायटीत द्यावा लागेल जास्तीचा मेंटेनन्स, हायकोर्टाकडून शिक्कामोर्तब
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल