मुंबईतील विविध भागात एकूण 51 कबुतरखाने आहेत. या ठिकाणी कबुतरांना चारा देण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच मनपा निर्बंधानंतरही कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांकडून 500 रुपायांचा दंड वसूल करत होती. आता मात्र कारवाई अधिक कडक करण्यात आली असून मुंबई मनपाकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येत आहे. मनपाने आतापर्यंत 1 लाख 39 हजार रुपये दंड वसूल केला आहे. तसेच बीएमसीने 182 जणांच्या विरोधात गुन्हे देखील दाखल केले आहेत.
advertisement
जी दक्षिणमध्ये 48 गुन्हे दाखल
बीएमसी अधिकाऱ्याने सांगितले की, मुंबईत सर्वाधिक दंड दक्षिण वॉर्डातील पांडुरंग बुधकर मार्गावर ग्लोबमिल म्युनिसिपल स्कूलजवळ करण्यात आली आहे. याठिकाणी 48 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. तर याच वार्डातील गणपतराव कदम मराग् पेनिनसुला कॉर्पोरेट पार्कजवळ असणाऱ्या कबुतरखान्यात खाद्य टाकणाऱ्या 54 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. याठिकाणाहून जवळपास 1 लाख 2 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
दरम्यान, के पूर्व, अंधेरी पूर्व, आर. के. सिंह रोड, विले पार्ले पूर्व, हनुमान रोड आणि श्रद्धानंद रोड परिसरात देखील कबुतरांना दाणे टाकणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. या ठिकाणी जवळपास 75 प्रकरणे दाखल असून त्यांच्याकडून 34 हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.