TRENDING:

Mumbai Local: मुंबईतल्या जीवघेण्या गर्दीवर पश्चिम रेल्वेचा उतारा, सकाळी 6 ते 10 पोलिसांचा खडा पहारा

Last Updated:

नालासोपाऱ्यात सकाळच्या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल पकडण्यासाठी हजारो प्रवासी एकाच वेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी करतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विजय देसाई, प्रतिनिधी
News18
News18
advertisement

मुंबई :  नालासोपाऱ्यातून लोकल ट्रेनमध्ये चढताना होणारी प्रचंड गर्दी, धक्काबुक्की आणि त्यातून घडणारे अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा आणि अभिनव उपक्रम सुरू केला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, शिस्तबद्ध आणि सुखकर करण्याच्या उद्देशाने नालासोपारा रेल्वेस्थानकावर आता लोकल ट्रेनमध्ये रांगेत चढण्याची आणि उतरण्याची व्यवस्था लागू करण्यात आली आहे.

पश्चिम रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून ओळख असलेल्या नालासोपाऱ्यात सकाळच्या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकल पकडण्यासाठी हजारो प्रवासी एकाच वेळी प्लॅटफॉर्मवर गर्दी करतात. लोकल येताच ट्रेनमध्ये चढण्यासाठी झुंबड उडते. या गोंधळात अनेकदा प्रवाशांचे पाय घसरून पडणे, धक्काबुक्कीमुळे जखमी होणे, तर कधी गंभीर अपघात घडण्याच्या घटना घडत होत्या. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत ही नवी व्यवस्था राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

advertisement

लोहमार्ग पोलीस दलाचे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात 

या उपक्रमाअंतर्गत सकाळी सहा ते दहा या वेळेत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मवर प्रवाशांना शिस्तबद्ध रांगेत उभे करूनच ट्रेनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलीस दलाचे कर्मचारी प्लॅटफॉर्मवर तैनात राहणार असून, ते रांगा लावण्यासह गर्दी नियंत्रणाचे काम करणार आहेत.

advertisement

चढण्या-उतरण्याच्या वेळी होणारा गोंधळ कमी करण्यासाठी  मोठा निर्णय 

तसेच लोकलच्या प्रत्येक डब्ब्याच्या गेटजवळ पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या खुणा करण्यात आल्या आहेत. पिवळ्या रंगाच्या ठशांवरून प्रवाशांनी उतरायचे, तर हिरव्या रंगाच्या ठशांवरून चढायचे, असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे चढण्या-उतरण्याच्या वेळी होणारा गोंधळ कमी होऊन प्रवाशांचा प्रवाह सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

advertisement

गर्दीच्या स्थानकांवरही अशी सुविधा करण्याच्या विचारात 

रेल्वे प्रशासनाने या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रवाशांनी शिस्त पाळावी, नियमांचे काटेकोर पालन करावे आणि सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. प्रवाशांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास हा प्रयोग केवळ नालासोपाऱ्यापुरता मर्यादित न राहता इतर गर्दीच्या स्थानकांवरही राबवला जाऊ शकतो. त्यामुळे दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुखकर होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.

advertisement

हे ही वाचा :

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
तरुण शेतकऱ्याने केला कलिंगडाचा यशस्वी प्रयोग, 65 दिवसांत 5 लाख कमाई
सर्व पहा

Mumbra Crime : मुंब्रा हादरले! अनैतिक संबंधाचा रक्तरंजित शेवट; नवरा-बायकोचे चक्रावणारे कांड आले समोर

मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai Local: मुंबईतल्या जीवघेण्या गर्दीवर पश्चिम रेल्वेचा उतारा, सकाळी 6 ते 10 पोलिसांचा खडा पहारा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल