अतुल घोडके यांनी पारंपरिक पिकांच्या मागे न लागता बाजारपेठेचा सखोल अभ्यास केला. सध्या बाजारात कलिंगडाला असलेली मागणी लक्षात घेऊन त्यांनी 07 डिसेंबर 2025 रोजी दोन एकर क्षेत्रात सिंबा या जातीच्या कलिंगडाची लागवड करण्याचा धाडसी निर्णय घेतला.
'तुमचं जेवण खाल्लं की आईची आठवण येते!...'पुण्यात माय-लेकींनी जिंकली विद्यार्थ्यांची मनं!
कलिंगडची लागवड योग्य प्रकारे करून घेतली.तसेच कलिंगडवर भुरी,करपा, बोकड्या हा रोग होऊ नये,यासाठी दोन दिवसाला फवारणी करून पिकाचे योग्य व्यवस्थापन केलं. सिंबा जातीच्या कलिंगड लागवडीसाठी अतुल यांना 2 लाख रुपये पर्यंत खर्च आला आहे. तर लागवडीचा खर्च वजा करून 65 दिवसात 5 लाखांचा नफा मिळाला असल्याची माहिती अतुलने दिली.
advertisement
पदवी घेऊनही नोकरीसाठी वणवण करण्यापेक्षा स्वतःच्या शेतात मेहनत घेऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेती नक्कीच परवडते, असा आत्मविश्वास अतुल यांनी व्यक्त केला आहे. सध्या बाजारात कलिंगडला 25 ते 30 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. योग्य पिकाची निवड करून नियोजन, जिद्द आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली, तर मातीतूनही सोनं पिकवता येतं, हेच अतुल यांनी आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवले आहे.





