advertisement

नोकरीला जोड एक्स्ट्रा इन्कम हवंय? छोट्या खोलीत सुरू करा ही शेती, महिन्याला कराल बक्कळ कमाई

Last Updated:
Smart Farming : बदलत्या जीवनशैलीत आज अनेकजण घरबसल्या करता येईल, कमी भांडवलात सुरू होईल आणि जोखीम तुलनेने कमी असेल असे काम शोधत आहेत.
1/6
बदलत्या जीवनशैलीत आज अनेकजण घरबसल्या करता येईल, कमी भांडवलात सुरू होईल आणि जोखीम तुलनेने कमी असेल असे काम शोधत आहेत. अशा वेळी मशरूम शेती हा एक उत्तम पर्याय म्हणून पुढे येत आहे. विशेष म्हणजे या व्यवसायासाठी मोठी जमीन, अवजड यंत्रसामग्री किंवा लाखोंची गुंतवणूक लागत नाही. थोडे प्रशिक्षण, योग्य नियोजन आणि सातत्य ठेवल्यास मशरूम शेतीतून दरमहा समाधानकारक उत्पन्न मिळवता येते.

2/6
वाढती मागणी, वाढता नफा -  आज शहरांपासून ते लहान तालुक्यांपर्यंत मशरूमची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. आरोग्याबाबत जागरूकता वाढल्यामुळे लोक सेंद्रिय आणि पौष्टिक अन्नाकडे अधिक वळत आहेत. मशरूममध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असल्याने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, सुपरमार्केट तसेच घरगुती वापरात त्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होत आहे. त्यामुळे कमी कालावधीत चांगला परतावा देणारा व्यवसाय म्हणून मशरूम शेती ओळखली जात आहे.

3/6
कमी भांडवलात सुरुवात शक्य मशरूम शेती सुरू करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज नसते. साधारणपणे ५,००० ते १०,००० रुपयांत छोट्या प्रमाणावर युनिट उभारता येते. मशरूम बियाणे (स्पॉन), गहू किंवा भाताचा पेंढा, प्लास्टिकच्या पिशव्या आणि स्वच्छ, हवेशीर खोली इतक्याच गोष्टी आवश्यक असतात. घरामध्ये मोकळी जागा उपलब्ध असल्यास भाडे किंवा अतिरिक्त खर्चही वाचतो.

4/6
लागवडीची सोपी प्रक्रिया -  सर्वप्रथम पेंढा स्वच्छ करून उकळत्या पाण्यात प्रक्रिया केली जाते. त्यानंतर तो थंड करून त्यात मशरूमचे बियाणे मिसळले जाते. हे मिश्रण प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून पिशव्यांवर छोटे छिद्र पाडले जातात. नंतर या पिशव्या थंड, अंधाऱ्या आणि किंचित ओलसर ठिकाणी टांगल्या जातात किंवा ठेवतात. साधारण २० ते २५ दिवसांत मशरूम उगवू लागतात.

5/6
तापमान व आर्द्रतेचे महत्त्व मशरूम लागवडीसाठी योग्य वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते. साधारण १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता अनुकूल मानली जाते. खोली थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून एक-दोन वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी, मात्र पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
तापमान व आर्द्रतेचे महत्त्व -  मशरूम लागवडीसाठी योग्य वातावरण अत्यंत महत्त्वाचे असते. साधारण १५ ते २५ अंश सेल्सिअस तापमान आणि ७० ते ८० टक्के आर्द्रता अनुकूल मानली जाते. खोली थेट सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावी. ओलावा टिकवून ठेवण्यासाठी दिवसातून एक-दोन वेळा पाण्याची हलकी फवारणी करावी, मात्र पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.
advertisement
6/6
महिन्याला हजारोंचे उत्पन्न - जर सुरुवातीला १०० पिशव्यांपासून लागवड केली, तर एका महिन्यात चांगले उत्पादन मिळू शकते. सध्या बाजारात मशरूमचा दर १५० ते ३०० रुपये प्रतिकिलो इतका आहे. योग्य विक्री व्यवस्था असल्यास दरमहा १५,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळू शकते. अनुभव वाढल्यानंतर आणि उत्पादन वाढवल्यास हा नफा आणखी मोठ्या स्तरावर नेणेही शक्य आहे.

दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement