advertisement

Pune News: ऑफिसला जाण्याआधी तपासा पर्यायी मार्ग; हिंजवडीतील हे रस्ते आज 6 तासांसाठी बंद

Last Updated:

हिंजवडी आणि रहाटणी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत.

वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
वाहतुकीत बदल (फाईल फोटो)
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज, गुरुवारी (१९ फेब्रुवारी) पिंपरी-चिंचवड शहरात भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हिंजवडी आणि रहाटणी परिसरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले असून, काही रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी याबाबतचे आदेश दिले असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन केले आहे.
हिंजवडी परिसरातील बदल (दुपारी ३ ते रात्री ११):
हिंजवडी गावठाण ते शिवाजी महाराज चौक या मार्गावर मिरवणूक निघणार असल्याने कस्तुरी चौक ते शिवाजी महाराज चौक हा रस्ता पूर्णपणे बंद असेल.
मारुंजी वाय जंक्शनकडून येणारी वाहने कस्तुरी चौक, विनोदे वस्ती आणि इंडियन ऑइल चौक मार्गे जातील.
मेझा २ चौकाकडून गावठाणकडे जाणारी वाहतूक इंडियन ऑइल चौक आणि कस्तुरी चौकामार्गे वळवण्यात आली आहे.
advertisement
मेझा २ चौकाकडून शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या दोन लेनपैकी डावी लेन बंद करण्यात आली असून, वाहतूक केवळ उजव्या लेनने सुरू राहील.
रहाटणी परिसरातील बदल (सायंकाळी ५ ते रात्री ११):
रहाटणी फाटा ते गोडांबे चौक: या मार्गावर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असून, ही वाहने काळेवाडी फाटा मार्गे जातील.
गोडांबे चौक ते शिवाजी महाराज पुतळा (रहाटणी गाव): या मार्गावर सर्व वाहनांना बंदी असून, वाहतूक कोकणे चौकामार्गे वळवण्यात आली आहे.
advertisement
महादेव मंदिर ते पुतळा चौक: हा मार्गही बंद असून वाहनचालकांनी पी. के. चौकाचा वापर करावा.
शिवजयंतीच्या उत्सवात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. आयटी पार्क आणि परिसरातील नोकरदारांनी वेळेचे नियोजन करूनच प्रवासासाठी बाहेर पडावे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: ऑफिसला जाण्याआधी तपासा पर्यायी मार्ग; हिंजवडीतील हे रस्ते आज 6 तासांसाठी बंद
Next Article
advertisement
दलाल स्ट्रीटवर खळबळ, एका बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; झटक्यात 35,000 कोटींच्या शेअर्सची बंपर खरेदी
दलाल स्ट्रीटवर खळबळ, बड्या खेळाडूने केली मोठी उलथापालथ; 35,000 कोटींची खरेदी
  • शेअर मार्केटमध्ये भूकंप! पूर्ण 'गेम'च बदलला

  • बाजारात बड्या माशाने स्वस्तात उचलला माल

  • 35,000 कोटींची बंपर खरेदी

View All
advertisement