मध्य रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, कर्जत येथे सलग चार दिवस ट्राफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येईल. यामध्ये काही गाड्या रद्द राहतील तर काही गाड्यांचे टर्मिनेशन/ओरिजिनेशन कर्जत येथेच होईल. मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार 4 दिवसांचा ब्लॉक पुढील प्रमाणे असेल.
Mumbai News: मुंबईत ईदची सुट्टी 5 नव्हे 8 सप्टेंबरला, राज्यात कधी? सोमवारी काय बंद राहणार?
advertisement
पहिला ब्लॉक : शनिवार, 6 सप्टेंबर 2025
कालावधी: दुपारी 2.30 ते 4.30 (एकूण 2 तास)
कामाचा विभाग: अप मार्गावर – कर्जत (प्लॅटफॉर्म वगळून) ते नागनाथ केबिन (क्रॉसओव्हर वगळून)
परिणाम:
कर्जतवरून दुपारी 3.39 वाजता सुटणारी खोपोली लोकल रद्द राहील. तसेच खोपोलीवरून दुपारी 2.55 वाजता सुटणारी कर्जत लोकल रद्द राहील. त्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना पर्यायी गाड्यांचा विचार करावा लागेल.
दुसरा ब्लॉक : रविवार, 7 सप्टेंबर ते मंगळवार, 9 सप्टेंबर 2025
कालावधी: दुपारी 2.30 ते 5.00 (एकूण 2 तास 30 मिनिटे)
कामाचा विभाग: अप मार्गावर – कर्जत (प्लॅटफॉर्म वगळून) ते नागनाथ केबिन (क्रॉसओव्हर वगळून)
परिणाम:
रविवार ते मंगळवार या काळात सीएसएमटीहून दुपारी 12.20 वाजता सुटणारी खोपोली लोकल केवळ कर्जतपर्यंतच धावेल आणि कर्जत ते खोपोलीदरम्यान ही सेवा रद्द राहील. तसेच खोपोलीहून संध्याकाळी 4.30 वाजता सुटणारी सीएसएमटी लोकल कर्जतपासून सुरू होईल. ही गाडी कर्जत स्थानकावरून संध्याकाळी 4.57 वाजता सुटेल. खोपोली ते कर्जतदरम्यान ही लोकल रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, या ब्लॉक काळात प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचे नियोजन करताना गाड्यांमधील बदलांचा विचार करावा. तसेच रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले आहे.