Mumbai News: मुंबईत ईदची सुट्टी 5 नव्हे 8 सप्टेंबरला, राज्यात कधी? सोमवारी काय बंद राहणार?

Last Updated:

Mumbai News: मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ईद ए मिलादची शासकीय सुट्टी 5 सप्टेंबर ऐवजी आता 8 सप्टेंबरला जाहीर करण्यात आली आहे.

Mumbai News: मुंबईत ईदची सुट्टी 5 नव्हे 8 सप्टेंबरला, सोमवारी काय बंद राहणार?
Mumbai News: मुंबईत ईदची सुट्टी 5 नव्हे 8 सप्टेंबरला, सोमवारी काय बंद राहणार?
मुंबई: मुस्लिम धर्मियांचा पवित्र सण ईद-ए-मिलाद सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. त्यामुळे राज्य सरकारकडून 5 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता मुंबईत 5 ऐवजी 8 सप्टेंबर रोजी ईद ए मिलादची सुट्टी राहणार आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरासाठी सोमवारी शासकीय सुट्टी असेल.
मुंबईसह उपनगर आणि जवळच्या शहरांत गणेशोत्सवाची धूम आहे. या ठिकाणी मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा केला जातो. 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असल्याने मोठ्या विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. त्यामुळे ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल करण्याची मागणी आमदार अमीन पटेल, रईस शेख आणि नसीम खान यांनी राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार गुरुवारी राज्य सरकारने या निर्णयात बदल करून 8 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर केली.
advertisement
मुंबईत ईदचा जुलूस 8 सप्टेंबर रोजी
शनिवारी 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हा हिंदूंचा सण आहे. राज्यात बंधुता आणि ऐक्य कायम राहावे यासाठी मुस्लिम समुदायाने जुलूसचा कार्यक्रम 8 सप्टेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दिवशी शासकीय सुट्टी राहील.
advertisement
सोमवारी काय बंद राहणार?
राज्य शासनाच्या नवीन निर्णयानुसार मुंबई शहर आणि उपनगरांतील शासकीय कार्यालये 5 सप्टेंबर रोजी नियमित सुरू राहतील. तसेच शुक्रवारी मुंबईतील बँका, शाळा, महाविद्यालये आणि केंद्र सरकारची कार्यालये देखील सुरू राहतील. त्याऐवजी सोमवारी बँका व अन्य शासकीय कार्यालये बंद राहतील.
मुंबई वगळता राज्यात शुक्रवारीच सुट्टी
मुंबईच्या जवळ असणाऱ्या ठाणे, नवी मुंबईसह इतर शहरांत शुक्रवारीच ईदची सुट्टी राहील. त्यामुळे मुंबई वगळता संपूर्ण राज्यात बँका आणि शासकीय कार्यालये शुक्रवारी बंद राहणार असून सोमवारी नियमित सुरू राहतील.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Mumbai News: मुंबईत ईदची सुट्टी 5 नव्हे 8 सप्टेंबरला, राज्यात कधी? सोमवारी काय बंद राहणार?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement